वकिलांचा संप, कोर्टातील कामकाज ठप्प

  Borivali
  वकिलांचा संप, कोर्टातील कामकाज ठप्प
  मुंबई  -  

  मुंबई - बोरीवलीत शुक्रवारी वकिलांनी कामबंद आंदोलन करत 'न्यू प्रपोज लॉ अमेंडमेंट'चा विरोध केला. विधी आयोग द्वारा प्रास्तावित अधिवक्ता अधिनियम (संशोधन) विधेयक 2017च्या विरोधात वकिलांनी हा संप पुकारला.

  बोरिवली वकिलाच्या मते, जर हे विधेयक लागू करण्यात आले तर वकिलांची संस्था ही अशा व्यक्तींच्या हाती जाईल ज्याचा वकिली पेशाशी काहीही संबंध नाही. विदेशी कंपन्या भारतात येऊन आपापल्या फर्म टाकतील आणि इथल्या वकिलांना त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल, अशी भिती वकिलांनी व्यक्त केली आहे. "आम्ही स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्ररित्या काम करणार," असे बोरीवली बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेश मोरे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे विधेयक आम्हाला मान्य नाही आणि ते आम्ही पास होऊ देणार नाही, असा इशारा वकिलांनी दिला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.