मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टवर आग

  Mumbai
  मुंबई डोमेस्टिक एअरपोर्टवर आग
  मुंबई  -  

  मुंबईतील आगीचं सत्र सुरूच असून शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या दरम्यान डोमेस्टिक एअरपोर्टला आग लागल्याची घटना घडली आहे. डोमेस्टिक एअरपोर्ट येथील गेट नंबर ९ जवळील पेरिमोनियम लाऊन्जला ही आग लागली असून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ही आग विझवण्यात आली.


  पेरिमोनियम लाऊन्जला लागली आग

  दुपारी १.५४ मिनिटांनी पेरिमोनियम लाऊन्जला आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ फायर इंजिन आणि ४ जेटी घटनास्थळी रवाना झाल्या.


  मुंबई जळतेय!

  १९ डिसेंबरला साकीनाक्यातील फरसाणच्या दुकानाला आग लागली आणि या आगीत १२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच २९ डिसेंबरला कमला मिलमध्ये आग आली. या आगीने १४ जणांचा बळी घेतला. यानंतर आगीच्या घटनांचे सत्र सुरू झाले ते अद्यापही सुरूच आहे. अंधेरी, मरोळ येथील मैमुन मेन्शनमध्ये लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा बळी गेला. तर डॉकयार्ड रोड येथे लागलेल्या आगीत सात दुकानं जळून खाक झाली होती.


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.