Advertisement

भानू फरसाण दुकानाच्या आगीप्रकरणी स्वच्छता निरीक्षक निलंबित


भानू फरसाण दुकानाच्या आगीप्रकरणी स्वच्छता निरीक्षक निलंबित
SHARES

अंधेरीच्या साकिनाका येथील खैराणी मार्गावरील भानूदास फरसाण मार्टला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेप्रकरणी एल विभागाचे स्वच्छता निरीक्षक जगदीश सावंत यांना निलंबित करण्यात आलं आहे. याशिवाय पदनिर्देशित अधिकारी प्रवीण वसावे, राहुल मारेकर, अमोलपाटील, विश्वनाथ पवार आदींची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.


अहवालावर शिक्कामोर्तब

भानू फरसाण आग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त राम धस यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. धस समितीने आपला अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केल्यानंतर त्यांनी केलेल्या शिफारशींवर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.


निष्काळजीपणाचा ठपका

धस समितीने दिलेल्या या अहवालावर भानू फरसाण मार्टची जागा गलिच्छ वस्तीत असल्याने त्याची तपासणी करून नोटीस देण्यात आली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, यासंदर्भात तक्रार आल्यानंतर महापालिकेच्या अधिकारी कारवाई करायला गेले होते. पण त्यावेळी या दुकानाला टाळं होतं. त्यामुळे ते दुकान बंद असल्याने कारवाई न करता अधिकारी निघून गेले. पण पुढे या दुकानाकडे कधीही पाहिलं नाही. त्यामुळे यांच्या निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.


शाॅर्टसर्किटमुळे आग

फरसाण मार्टला भांडवली मूल्यावर आधारीत कर लावण्यात यावा. त्याशिवाय येथील अनधिकृत जलवाहिन्यांचा शोध घेण्याची शिफारसही या अहवात करण्यात आली आहे. परंतू फरसाण मार्टला शाॅर्टसर्किटमुळे आग लागल्याचं अग्निशमन अहवालात निष्पन्न झाल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करता येत नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांची यातून सुटका होणार आहे.



हेही वाचा-

खैराणी रोड भागात फरसाणच्या दुकानाला आग, १२ जणांचा होरपळून मृत्यू

कमला मिल आग: प्रत्येक दोषीवर कारवाई करा, माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांची याचिका



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा