Advertisement

भायखळा मार्केट पूल कधी बनणार?


भायखळा मार्केट पूल कधी बनणार?
SHARES

भायखळा रेल्वे स्थानकाजवळ असलेला भायखळा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा 100 वर्ष जुना पादचारी पूल जीर्ण झाला होता. त्यामुळे जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेकडून तो पाडण्यात आला. हा पूल पाडून सहा महिने उलटले. पण पूल पुन्हा बांधण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पूल नसल्याने स्थानिकांची अत्यंत गैरसोय होत आहे. पश्चिमेकडून पूर्वेला जाण्यासाठी स्थानिकांना खडा पारशी परिसरातून वळसा घालून जावे लागत आहे. नजीकचा रस्ता म्हणून भायखळा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाचा वापर केल्यास अनेक वेळा तिकीट चेकरकडून दंड आकारला जातो. पावसाळा सुरू झाला असून या वेळी पादचारी पुलाची अत्यंत आवश्यकता होती. पूल नसल्यामुळे शाळकरी मुलांचे मोठे हाल होत आहे. पावसाळ्यापूर्वी या पुलाचे काम पूर्ण व्हायला हवे होते, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.


मुंबई महानगरपालिकेकडून भायखळा पादचारी पूल बनवण्याकरता रेल्वेला निधी देण्यात आला आहे. हा पूल रेल्वेद्वारे बांधला जात असून लवकरच त्याचे काम पूर्ण होईल.

किशोर देसाई, सहायक आयुक्त, ई वॉर्ड


भायखळा पूल गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे जायला भायखळा रेल्वे स्थानकाला वळसा घालून जावे लागत आहे. मुलांना शाळेत जायलाही उशीर होतो. आता पावसाळा असल्यामुळे खूपच हाल होत आहेत.

वृषाली चव्हाण, स्थानिक नागरिक

पूल बनवण्यास सुरुवात झाली असली, तरी सहा महिन्यांत फक्त चार खांब लावण्याचे काम येथे झालेले दिसत आहे. असेच काम सुरू राहिले तर हा पूल बनून तयार व्हायला कित्येक वर्ष लागतील, अशी नाराजी येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.



हेही वाचा -

रेतीबंदर आणि मृदुंगआचार्य मैदानाला जोडलेल्या पुलाची दुरवस्था

पादचारी पुलाची दुरवस्था


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा