Advertisement

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध गेल्या काही महिन्यांत शिथील करण्यात आले आहेत. विविध सेवा हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. या सवलती यापुढेही कायम राहणार आहेत.

राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊन
SHARES

राज्य सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत अनलॉकच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. राज्यात कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन असणार आहे. १ ते ३० नोव्हेंबर असा लॉकडाऊनचा सहावा टप्पा असणार आहे. 

केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी देशातील अनलॉक सहाची घोषणा केली. त्यानुसार कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊन ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंधित उपायांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. एका राज्यातून दुसर्‍या राज्यात व्यक्ती व वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीवर कोणतेही बंधन नाहीत. यासाठी स्वतंत्र परवान्याची आवश्यकता लागणार नाही. .

राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध गेल्या काही महिन्यांत शिथील करण्यात आले आहेत. विविध सेवा हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. या सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. कोविड नियम पाळून १००  लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मोठ्या संख्येने लोक एकत्र जमण्याच्या काही विशिष्ट प्रसंगांमध्ये काही निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे. आरोग्य आणि सुरक्षिततेच्या खबरदारीबाबत कार्य पद्धतीचे पालन अनिवार्य आहे. यामध्ये मेट्रो रेल्वे; शॉपिंग मॉल्स; हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि आतिथ्य सेवा; धार्मिक स्थळे, योग आणि प्रशिक्षण संस्था; व्यायामशाळा; चित्रपटगृहे मनोरंजन पार्क यांचा समावेश आहे.

राज्यात जून महिन्यापासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. राज्य सरकारने अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात हॉटेल्स, फूडकोर्ट्स, रेस्टॉरंट आणि बार हे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर लोकलमधून सर्व महिलांना वेळेची अट घालून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली.



हेही वाचा -

Coronavirus Updates: मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत बाधितांच्या संख्येत घट

नवी मुंबईत महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी १८६ दिवसांवर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा