Advertisement

'एल अँड टी’चा झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजूर होणार का?


'एल अँड टी’चा झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजूर होणार का?
SHARES

पवईतील तुंगा आणि पासपोली गाव परिसरातील तब्बल 375 झाडांवर 'लार्सन अँड टुब्रो' (एल अँड टी) कुऱ्हाड चालवणार आहे. ‘एल अँड टी’ने या ठिकाणची झाडे यापूर्वी अनधिकृतपणे कापण्यास सुरुवात केली होती. परंतु, याविरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर आता त्यांनी महापालिकेकडे झाडे कापण्यासाठी परवानगी मागितली आहे. यामध्ये त्यांनी 83 झाडे कापण्यास आणि 192 झाडे पुनर्रोपित करण्यासाठीचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाच्या बैठकीपुढे ठेवला आहे. याविरोधात पोलिस तक्रार दाखल झालेली असतानाच ही झाडे कापण्यासाठी परवानगी मागितली असल्यामुळे हा प्रस्ताव वादात अडकण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

मेट्रो-३ साठी झाडांची कत्तल सुरु; पर्यावरणवादी पुन्हा आक्रमक


मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या आड येणाऱ्या आरे कॉलनीतील झाडे कापण्यास शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे एका बाजूला सरकारी प्रकल्पाला विरोध दर्शवणारी शिवसेना आता खासगी विकासक आणि कंपन्यांच्या विकास कामांमधील झाडे कापण्यास कशाप्रकारे परवानगी देते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या ‘एस’ प्रभागातील पवईतील तुंगा आणि पासपोली गावामधीलनगर भू क्रमांक 86, 87, 112, 115 आणि 116 यावरील कार्यालयाच्या इमारत बांधकामाच्या आड येणारी 192 झाडे पुनर्रोपित करण्यास आणि 83 झाडे कापण्यास परवानगी मिळण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीपुढे प्रस्ताव सादर केला. परंतु, याच ठिकाणी लार्सन अँड टुब्रो कंपनीने अनधिकृत झाडांची कापणी केल्यामुळे त्यांच्या कंत्राटदाराविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर लार्सन अँड टुब्रो कंपनीने ही चूक कंत्राटदाराकडून अजाणतेपणे घडली असल्याचे मान्य केले होते.


हेही वाचा

वडाच्या तुटलेल्या फांद्यांना जीवनदान, 'ग्रीन अंब्रेला'चा अनोखा उपक्रम


यावेळी, त्यांनी आमची कंपनी अनेक वर्षे स्वखर्चाने मुंबई आणि मुंबईबाहेरील मोठ्या परिसरात वृक्षारोपण, तसेच सुशोभिकरणाची कामे करत असल्याचा दावा महापालिकेकडे केला आहे. उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत विधी खात्याकडून अभिप्राय घेतला असून लार्सन अँड टुब्रो यांच्या वृक्ष कापणी आणि पुनर्रोपणाच्या अर्जावर उद्यान अधिक्षक गुणवत्तेनुसार निर्णय घेऊ शकतात. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असली, तरी याबाबतचा प्रस्ताव समांतरपणे स्वीकारता येईल, असे विधी विभागाने म्हटल्याचे उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा