Advertisement

महालक्ष्मीतील कचरा कंत्राटही काळ्या यादीतील कंपनीलाच!


महालक्ष्मीतील कचरा कंत्राटही काळ्या यादीतील कंपनीलाच!
SHARES

गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा काढून देवनार व कांजूर येथील मुख्य डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकण्यासाठी काळ्या यादीतील संलग्न कंपनी असलेल्या कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट याच कंपनीला आता महालक्ष्मी व लव्ह ग्लोव्ह कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे कंत्राट बहाल करण्यात येत आहे. या कंपनीला कंत्राट न देण्याबाबत सदस्यांनी तीव्र विरोध केला होता. परंतु, तोच प्रस्ताव राखून ठेवला असताना तो कागदोपत्री मंजूर दाखवत या कंपनीला गोराईचे काम दिले गेले. आता याच कामाच्या आधारे महालक्ष्मीतील कचरा कंत्राटाचे काम देण्याचा घाट प्रशासन आणि स्थायी समितीने घातला आहे.


एक वर्षाकरता दिलं कंत्राट

कुलाबा ते माहीम-धारावी या भागातील कचरा गोळा करून महालक्ष्मी कचरा हस्तांतरण केंद्र आणि लव्ह ग्रोव्ह पम्पिंग कचरा हस्तातरण केंद्र या ठिकाणी जमा केला जातो. इथून हा कचरा देवनार, मुलुंड आणि कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंडवर नेला जातो. या ठिकाणच्या १० वर्षांचे कंत्राट ३ मे २०१७ ला संपुष्टात आल्यावर कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला १ वर्षाचं कंत्राट देण्यात आलं. आता याच कंपनीला पुढील एक वर्षाकरता कंत्राट दिलं जात आहे. प्रतिदिन ६५० मेट्रिक टन कचऱ्याची डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्यासाठी ६.८६ कोटी रुपयांचं कंत्राट दिलं जात आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाने आपल्या अधिकारात २७ दिवसांचं ४८.८० लाखांचं कंत्राट देऊन टाकलं आहे.


कविराज इन्फ्राटेक काळ्या यादीत

कविराज या कंपनीला नालेसफाईच्या कामात काळ्या यादीत टाकले आहे. मात्र, कविराज इन्फ्राटेक ही कंपनी आणि कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट या कंपनी वेगळ्या आहेत. विधी विभागाचा अभिप्राय घेऊन 'कविराज एमबीबी वेस्ट मॅनेजमेंट'ला कचऱ्याचं कंत्राट देण्याचं काम प्रशासनाने केलं होतं. गोराईतील कचरा कंत्राट कामाला सर्व सदस्यांनी विरोध केला असताना यापूर्वी हा प्रस्ताव कागदोपत्री मंजूर दाखवून गोराईचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्यामुळे महालक्ष्मी येथील कचरा उचलण्याचे कंत्राट बहाल करण्यात येत आहे.



हेही वाचा

एफआयआर दाखल, तरीही मिळालं रस्त्याचं कंत्राट


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा