Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

मुळशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत पोहोचवा- मुख्यमंत्री

दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तत्काळ मिळावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुळशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत पोहोचवा- मुख्यमंत्री
SHARES

पुणे जिल्ह्यातील उरवडे (ता. मुळशी) (Pune Mulashi) येथील रासायनिक कंपनीतील स्फोट आणि आगीतील मृत्यूप्रकरणी औद्योगिक सुरक्षा मानकांचा गांभीर्याने आढावा घेण्यात यावा. तसंच दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना जाहीर करण्यात आलेली शासकीय मदत तत्काळ मिळावी यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले आहेत.

उरवडेतील या रासायनिक कंपनीतील दुर्घटनेबाबत चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीनेही सर्वंकष चौकशीनंतर तातडीने अहवाल सादर करावा. मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबतही  प्रशासनाने कार्यवाही करून, लवकरात लवकर सबंधितांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून द्यावं. 

हेही वाचा- पुणे केमिकल कंपनी आग : मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत

औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्यांबाबत औद्योगिक सुरक्षा मानकांचा वारंवार आढावा घेण्यात यावा. सुरक्षा उपाययोजनांबाबत, तसंच नियमांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या उद्योंगावर कारवाई करण्यात यावी. सुरक्षा उपाययोजनांतील त्रुटींमुळे जीवितहानी होऊ नये याबाबत कठोरपणे पावले उचलण्यात यावीत, असेही निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला (Chemical Company) लागलेल्या आगीत १७ कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली.

या कंपनीमध्ये जवळपास ३७ मजूर काम करत होते. त्यापैकी १७ मजूर मृत्यूमुखी पडले आहेत. इतर २० जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यापैकी काही जखमींवर उपचार सुरू आहेत.

(maharashtra cm uddhav thackeray reaction on mulshi fire incident)

हेही वाचा- भुलीचं इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा