Advertisement

घरूनच करा बाबासाहेबांना अभिवादन, मुख्यमंत्र्यांचं आवाहन

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

घरूनच करा बाबासाहेबांना अभिवादन, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार पूर्ण सन्मानाने साजरा करण्यात यावी. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान म्हणून या दिवशी शिस्तीचं पालन केलं जाईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगाने आयोजित व्यापक बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

या बैठकीत जयंती समन्वय समितीच्या वतीने १४ एप्रिल या जयंतीदिनी कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमावलीचं पालन करून कार्यक्रमांचे आयोजन केलं जाईल. चैत्यभूमी स्मारक तसंच मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी गर्दी न करता अभिवादन केलं जाईल आणि राज्यभरातील अनुयायांनाही जयंती साजरी करण्याच्या शासन परिपत्रकातील नियमावलींचं पालन करून साधेपणाने जयंती साजरी करण्याचं आवाहन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

हेही वाचा- तुम्हीच पाठवा विजेचं रिडिंग, ऊर्जामंत्र्यांचं ग्राहकांना आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोनाच्या स्थितीतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिल स्थित स्मारकाचं काम सरकारने थांबू दिलेलं नाही. तेथील पुतळ्याची उंची आणि अनुषंगिक गोष्टींना गती दिली  आहे.

भीमसैनिक आणि डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे सन्मान करणारे आपण सर्व डॉ. आंबेडकर यांच्या शिस्तीचे भोक्ते आहोत, हे अशा कठीण परिस्थितीत दाखवून देणं अपेक्षित आणि आवश्यक आहे. त्यामुळे गर्दी न करता विविध समाजोपयोगी उपक्रमांनी जयंती साजरी करता येईल. रक्तदान शिबिरांचं आयोजन करता येईल. पण त्यासाठी आरोग्य विभाग आणि शासनाच्या सर्व यंत्रणांनी पुरेशी खबरदारी आणि पूर्वनियोजन करणं आवश्यक आहे.

जयंतीदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकस्थळावरून थेट प्रक्षेपणाद्वारे दर्शन घेण्याची सुविधा तसंच बीआयटी चाळ आणि इंदूमिल या ठिकाणच्या कार्यक्रमांसाठी सुविधा याबाबतही सूचना करण्यात आल्या. त्याबाबत कार्यवाहीचे निर्देशही यावेळी संबंधित यंत्रणांना देण्यात आले.

(maharashtra cm uddhav thackeray request to celebrate ambedkar jayanti in simple way)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा