Advertisement

राज्यात वाढतोय कोरोना; पुन्हा लागणार लॉकडाऊन?

मागील काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यभराच कोरोनाचा प्रादुर्भाव घटला होता. परंतू, आता पुन्हा एकदा कोरोनानं डोके वर काढलं आहे.

राज्यात वाढतोय कोरोना; पुन्हा लागणार लॉकडाऊन?
(Representational Image)
SHARES

मागील काही महिन्यांपासून मुंबईसह राज्यभराच कोरोनाचा प्रादुर्भाव घटला होता. परंतू, आता पुन्हा एकदा कोरोनानं डोके वर काढलं आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. मंगळवारी मुंबईत १ हजाराच्या वर तर महाराष्ट्रात २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या वाढती रुग्णसंख्या पाहता राज्याच पुन्हा लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विधान केलं आहे. राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये आम्हाला पुन्हा लॉकडाऊन पाहायचा नाही आहे, आम्हाला लोकांवर लॉकडाऊन लादायचा नाही आहे, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

'मुंबई शहर आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला परत लॉकडाऊन बघायचा नाही आहे. आम्हाला लोकांवर लॉकडाऊन लादायचा नाही आहे. म्हणून आम्ही नियमितपणे परिस्थितीचा आढावा घेत आहोत. बैठका घेत आहोत. तसेच निर्बंध कठोर करत आहोत. कायदे कठोर करतोय. ज्या कार्यक्रमांना याआधी परवानगी दिली होती, अशा कार्यक्रमांमधील उपस्थितीवरही निर्बंध घातले आहेत. त्याबरोबरच राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रित ठेवायची असेल तर जनतेचीही मदत लागेल', असं मुंबई आणि राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देताना अस्लम शेख यांनी म्हटलं.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, मंगळवारी राज्यात तब्बल २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर मुंबईत मंगळवारी १ हजार ३७७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या शहर उपनगरात ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

सोमवारी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ९६७ दिवसांवर होता. मंगळवारी हे प्रमाण ८४१ दिवसांवर आले आहे, तर २१ ते २७ डिसेंबरपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.९ टक्के झाला आहे. सोमवारी हा दर ०.७ टक्के इतका होता. दिलासादायक बाब अशी की आज राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झालेली नाही. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा