Advertisement

दिवाळीकरीता सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

येत्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून, नव-नवीन वस्तू, कपडे, कंदील, फराळाचे साहित्य व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली आहे.

दिवाळीकरीता सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
SHARES

येत्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असून, नव-नवीन वस्तू, कपडे, कंदील, फराळाचे साहित्य व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी केली आहे. नागरिकांचा वाढलेली गर्दी लक्षात घेता कोरोनाचा धोका वाढण्याची शक्याता अधिक असल्यानं सरकारनं नागरिकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मार्गदर्शक सूचना

दिवाळीत मंदिरांसह कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, घरगुती स्वरूपात सण साजरा करावा, फटाक्यांमुळं ज्येष्ठ नागरिकांना व कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना धुराचा त्रास होण्याची भीती लक्षात घेऊन फटाके टाळावेत, दिव्यांची आरास करून हा प्रकाशाचा उत्सव साजरा करावा, अशा विविध मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कपडे, फटाके, दागदागिने इतर वस्तू खरेदीसाठी दुकानांमध्ये व रस्त्यांवर गर्दी होत आहे. यामुळेच कोरोनाचा धोका कायम असल्यानं गर्दी टाळण्याचं आवाहन केलं आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांनी घराबाहेर पडणं टाळावं. मास्कसह सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळावेत. तसंच दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यातून ध्वनी आणि वायुप्रदूषणाची पातळी वाढते.

कोरोना झालेल्या व होऊन गेलेल्या लोकांना फटाक्यांच्या धुरामुळं श्वसनाचा त्रास वाढण्याची भीती आहे. त्यामुळं फटाके टाळून दिव्यांची आरास करून दीपावली हा प्रकाशाचा उत्सव साजरा करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. दीपावली उत्सवाबाबत स्थानिक पोलीस, प्रशासन आणि महापालिका हे स्थानिक परिस्थितीनुसार नियम जाहीर करतील व ते बंधनकारक असतील, असंही गृह विभागाच्या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा