Advertisement

चित्रपटगृहं, नाट्यगृहं उघडण्यासंदर्भातील नियमावली जाहीर

'या' नियमांची अमलबजावणी केल्यानंतर नाट्यगृह, चित्रपटगृहांमध्ये प्रवेश असेल.

चित्रपटगृहं, नाट्यगृहं उघडण्यासंदर्भातील नियमावली जाहीर
SHARES

राज्यभरातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे पुन्हा सुरू होत आहेत. याबाबतचा अध्यादेश शासनाकडून जारी करण्यात आला आहे. खालील दिलेल्या नियमांची अमलबजावणी केल्यानंतर नाट्यगृह, चित्रपटगृहांमध्ये प्रवेश असेल.

  • प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.
  • स्थानिक कोरोना परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करून निर्बंधांमध्ये वाढ करू शकतील.
  • सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे आणि समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखण्यात याव्यात.
  • नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू इत्यादी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल.
  • नाट्य कलाकार आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, अशी सूचना देण्यात येत आहे.
  • सर्व देखाव्यांची आणि कलाकारांसाठी असलेल्या कक्षांची दररोज धूम्र फवारणी करण्यात आली पाहिजे.
  • देखावे, प्रसाधनगृहे आणि रंगभूषा कक्ष यांच्या नियमित स्वच्छतेबाबत वेळापत्रक आखावे, स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी.
  • मास्कचा वापर बंधनकारक, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, अतिथींना कलाकारांच्या कक्षात परवानगी दिली जाणार नाही.
  • प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे.
  • गर्दी होऊ नये म्हणून लोकांना अंतर ठेवून रांगेनं बाहेर सोडलं जावं.
  • नाट्यगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही.
  • सर्व वातानुकूल उपकरणांचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे.
  • संभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणं
  • बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेपेक्षा प्रेक्षक संख्या जास्त असू नये.
  • बंदिस्त सभागृहातील व्यासपीट व प्रेक्षकंमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान ६ फूट) आवश्यक राहील.
  • तिकीट बुकिंग, अन्न आणि शीतपेयांसाठी पेमेंट करण्यासाठी डिजिटल किंवा संपर्क न भरण्याच्या पद्धती वापरल्या पाहिजेत.
  • स्क्रीनिंग हॉलमध्ये बाहेरचे अन्न आणि शीतपेये घेण्याची परवानगी नाही. खरेदी केलेले पॅकेज केलेले अन्न आणि शीतपेये फक्त स्क्रीनिंग हॉलच्या बाहेर परवानगी दिली जाईल.



हेही वाचा

गरबा कार्यक्रमावर पोलिसांची धाड, गुन्हा दाखल

बेस्टच्या ६० इलेक्ट्रिक बसेसचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा