Advertisement

सरकार सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनचे दरवाजे पुन्हा बंद करण्याच्या विचारात

महाराष्ट्र सरकार सर्वसामान्यांसाठी पुन्हा लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करण्याच्या विचारात आहे.

सरकार सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनचे दरवाजे पुन्हा बंद करण्याच्या विचारात
(File Image)
SHARES

राज्यात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सरकार चिंतेत आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार सर्वसामान्यांसाठी पुन्हा लोकल ट्रेनचे दरवाजे बंद करण्याच्या विचारात आहे.

सरकार परिस्थितीचा आढावा घेईल आणि येत्या काही दिवसांत अंतिम निर्णय घेण्याची अपेक्षा आहे, असं अहवालात सुचवण्यात आलं आहे. १० फेब्रुवारीपासून मुंबई लोकलचे दजरवाजे सर्व सामान्यांसाठी खुले करण्यात आले. पण त्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसली.

शिवाय, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)चे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी मंगळवारी, २ फेब्रुवारी रोजी एका मुलाखतीत सांगितलं की, लोकल ट्रेन पुन्हा सुरू झाल्यानं कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असेल. पण त्यांनी हे पण सांगितलं की येत्या काही दिवसात हे अधिक स्पष्ट होईल.

आय.एस. चहल म्हणाले, “मी पूर्वी नमूद केलं होतं की ट्रेनमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होईल. पण ट्रेन्समुळे केसेस वाढल्या आहेत की नाही हे समजण्यास आम्हाला तीन आठवडे लागतील.”

आता उद्धव ठाकरे सरकार दोन पर्याय शोधत आहे. त्यापैकी एक म्हणजे सर्वसामान्यांसाठी देण्यात येणाऱ्या वेळातील स्लॉट कमी करणं किंवा दुसरा सर्व सामान्यांना ट्रेनमध्ये पूर्णपणे प्रतिबंध करणं. फक्त आवश्यक सेवेत असणाऱ्यांना आणि वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांना प्रवास करता येऊ शकतो.

तथापि, एका राज्यमंत्र्यांनी सांगितलं की. ते सर्वसामान्यांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यास प्रतिबंधित करणार नाहीत. परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांच्यासाठी वेळापत्रक ठरवलं जाऊ शकतं.

राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वसामान्यांसाठी ट्रेन पुन्हा सुरू झाल्यानंतर तिन्ही मार्गावरील प्रवाशांची संख्या चार पट वाढली. त्यांनी असही नमूद केलं की, राज्य सरकार सर्वसामान्यांना देण्यात आलेली परवानगी पूर्णपणे मागे घेऊ शकते किंवा लोकांमधील गर्दी कमी करण्यासाठी दिलेला वेळ कमी करू शकते.

तत्पूर्वी, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना “कोविड संदर्भातील सर्व नियम पाळण्याचा इशारा दिला आहे. कारण ते पाळले गेले नाही तर आठवड्यानंतर मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.



हेही वाचा

रेल्वे मार्गावरील 'त्या' १९ स्थानकांच्या विकासाची रखडपट्टी

रेल्वे मार्गावरील गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी मध्य रेल्वे घेणार ड्रोनची मदत

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा