Advertisement

महाराष्ट्रात COVID चाचणीचे दर घटले, आता 'या' किंमतीत होणार चाचणी

कोरोनाव्हायरसच्या चाचण्या, मास्क, सॅनिटायझर्स आदी वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

महाराष्ट्रात COVID चाचणीचे दर घटले, आता 'या' किंमतीत होणार चाचणी
SHARES

कोरोनाव्हायरसच्या चाचण्या, मास्क, सॅनिटायझर्स आदी वस्तूंच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. येत्या आठवड्यात ही घट होणं अपेक्षित आहे.

कोरोनाव्हायरस या आजाराशी लढा देण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या किंमतींचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारनं दोन समित्या स्थापन केल्या आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, आरटी-पीसीआर चाचणी, ज्याची सध्या किंमत  १ हजार ९०० ते २ हजार ५०० च्या घरात आहे. ही किंमत घसरून १ हजार २०० ते १ हजार ५०० इतकी झाली आहे. 

कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे N95 मास्क १५० ते ३०० रुपयांना विकला जातो. तोच मास्क कदाचित ५० रुपये किंमतीत उपलब्ध होणार. सॅनिटायझर्सच्या किंमतीत देखील घट होऊ शकते. ७ जुलै पर्यंत २०० एमएल बाटलीची किंमत १०० रुपये इतकी होती.

यापूर्वी कोरोनाव्हायरस चाचण्या घेण्यासाठी ४ हजार ५०० रुपये आकारले जायचे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (आयसीएमआर) या किंमतीत देखील घट केली. राज्यांना परस्पर मान्य असणार्‍या किंमती निश्चित करण्यास सांगितलं होतं. 

नवीन निकषांनुसार, कोरोनाव्हायरससाठी आरटी-पीसीआर चाचण्या २ हजार २०० रुपयात करण्याचे आदेश देण्यात आले. तर घरातून नमुने गोळा करण्यात आलेल्या चाचण्यांची किंमत २ हजार ८०० इतकी निश्चित करण्यात आली होती.

पूर्वी मुंबई शहरात तीन रेट कार्ड होती. सार्वजनिक प्रयोगशाळांमध्ये मोफत, खाजगी प्रयोगशाळांमध्ये ४ हजार ५०० आणि पालिकेतर्फे खासगी सुविधा देणाऱ्या प्रयोगशाळा ३ हजार ५०० रुपये आकारत होत्या.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाव्हायरसचे २३ हजार ३५० नवे रुग्ण समोर आले आहेत. COVID च्या रुग्णांचा एकूण ९ लाख ७ हजार २१२ इतका झाला आहे. राज्यातील कोरोनाव्हायरससाचे रुग्ण बरे होण्याचा दर १९.५२ आहे.



हेही वाचा

कल्याण डोंबिवलीत ४८५ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

रुग्णालयांच्या तक्रारीसाठी नवी मुंबई पालिकेकडून कॉल सेंटर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा