Advertisement

२५ रुग्ण सापडल्यानंतर मालाडमधील इमारत सील

कोरोनाव्हायरसचे २५ रुग्ण सापडल्यानंतर मालाड इथल्या राणी सती मार्गावरील एक सोसायटी सील केली आहे.

२५ रुग्ण सापडल्यानंतर मालाडमधील इमारत सील
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)नं कोरोनाव्हायरसचे २५ रुग्ण सापडल्यानंतर मालाड इथल्या राणी सती मार्गावरील एक सोसायटी सील केली आहे.

२४ ऑगस्ट रोजी जेव्हा पहिले ४ रुग्ण आढळले तेव्हा अधिकाऱ्यांनी सोसायटीत आरोग्य शिबिर घेतले. त्यानंतर पुढील १० दिवसांत रुग्णांचा आकडा ४ वरूनन २५ वर गेला.

सुरुवातीला धारावी आणि वरळी कोरोनाव्हायरसचा हॉटस्पॉट म्हणून ओळखले जायचे. पण पालिकेनं इथल्या परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. पालिकेसाठी आता मुंबईतील पश्चिम उपनगर नवीन हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून उदयास येत आहेत.

याव्यतिरिक्त, बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाड आणि अंधेरीत कोरोनाचा प्रसार चिंताजनक आहे. २ सप्टेंबरपर्यंत मालाडचा समावेश असलेल्या पी उत्तर प्रभागाचा विकास दर ०.९८ टक्के आहे. तर शहराचा सरासरी विकास दर ९.९० टक्के आहे.

दरम्यान, रविवारी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित १९१० नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३७ जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात मुंबई शहरात उपचार घेऊन बरे झालेल्या ९११ जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली.

मुंबई शहारातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या १,५५,६२२ इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या २३,९३० डिस्चार्ज मिळालेल्या १,२३,४७८ आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या ७,८६६ जणांचाही समावेश आहे.



हेही वाचा

कोरोना रुग्णांसाठी ‘इतका’ ऑक्सिजन बंधनकारक, राज्य सरकारने दिला कंपन्यांना आदेश

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा