Advertisement

फेरीवाले आणि दुकानदार यांच्या मोफत चाचण्या सुरू, पालिकेनं उचललं मोठं पाऊल

बहुतेक बाजारपेठांमधील कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. खबरदारी म्हणून पालिका फेरीवाले आणि दुकानदारांच्या चाचण्या करत आहे.

फेरीवाले आणि दुकानदार यांच्या मोफत चाचण्या सुरू, पालिकेनं उचललं मोठं पाऊल
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं फेरीवाले आणि दुकानदारांच्या कोरोनाव्हायरससाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्यात प्रशासनानं दुकानं पुन्हा उघडण्यास परवानगी दिली. शम-विषम अशा पद्धतीनं काही दुकानं उघडली जाण्यास परवानगी देण्यात आली.

सध्या शहराचा सरासरी विकास दर ०.९० टक्के आहे. तरी किमान ९ वॉर्डमध्ये तो १ टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनाव्हायरसची १.५० लाख प्रकरणं नोंदवली गेली आहेत. ज्यात ७ हजार ७६१ मृत्यू झाले आहेत. सध्या मुंबईत २१ हजार ४४२ रुग्ण अक्टिव्ह आहेत.

हेही वाचा : उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ८ हजारांच्या वर

बहुतेक बाजारपेठांमधील कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. खबरदारी म्हणून पालिका फेरीवाले आणि दुकानदारांच्या चाचण्या करत आहे. जेणेकरून एखाद्या फेरीवाल्याकडून किंवा दुकानदाराकडून संक्रमण होण्याची शक्यता राहत नाही. चाचणी झाल्यानंतर दुकानदार, फेरीवाले ग्राहकांसोबत सुरक्षतपणे व्यवहार करू शकतात.

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत कोरोनाव्हायरसचे २० हजार ४८९ रुग्ण सापडले आहेत. जी आजपर्यंतची  सर्वात मोठी आकडेवाढ आहे. राज्यात COVID 19 रुग्णांची संख्या ८ लाख ८३ ८६२ इतकी झाली आहे. शिवाय, राज्यात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची वाढलेली आकडेवाडीची विक्रमी नोंद सलग चौथ्या दिवशी झाली आहे.हेही वाचा

मुंबईत कोरोना नियंत्रणासाठी ‘डोअर टू डोअर’ तपासणी

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!- राजेश टोपे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा