Advertisement

कामबंद आंदोलनाला सकारात्मक वळण: इंटर्न डॉक्टरांचा संप मागे

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर सहा दिवसानंतर मागे घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्याशी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टर कामावर रूजू झाले.

कामबंद आंदोलनाला सकारात्मक वळण: इंटर्न डॉक्टरांचा संप मागे
SHARES

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर सहा दिवसानंतर मागे घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. गिरीश महाजन यांच्याशी मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टर कामावर रूजू झाले.  

'असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स'चे अध्यक्ष दर्शन कळाळ यांनी १३ जूनपासून सुरू असलेला हा संप मागे घेतल्याचं मंगळवारी जाहीर केलं.


बैठकीत सकारात्मक चर्चा

महाराष्ट्रभरातील एकूण 18 वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयातील 2700 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यावेतनवाढीच्या मागणीसाठी 13 जूनपासून बेमुदत संपावर होते. मात्र मंगळवारी गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सात दिवसानंतर हा संप मिटला आहे.


विद्यावेतन वाढवणार

यावेळी इंटर्न डॉक्टरांनी केलेल्या मागण्या 2 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं. वाढीव विद्यावेतनमान दोन महिन्यांत देण्याचंही त्यांनी कबुल केलं, तसेच संपात सहभागी असणाऱ्या डॉक्टरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

वैद्यकीय वेतन ११ हजारापर्यंत देण्यात येईल सरकारने केलेल्या या घोषणेला तीन वर्षांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र यासंदर्भात सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने डॉक्टरांनी हा संप पुकारला होता.


हेही वाचा -

प्रशिक्षणार्थी डाॅक्टरांचा संप : २ महिन्यात वेतनवाढीवर मार्ग काढण्याचे अाश्वासन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा