Advertisement

लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असून ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी २०० जणांच्या उपस्थितीची परवानगी
SHARES

मुंबईसह राज्यभरात मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. यासोबतच कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. त्यामुळं नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा एकदा राज्यात निर्बंध लावण्यात आले. मात्र, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असून ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारनं सोमवारी निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

सरकारने नववर्षांच्या पार्श्वभूमीवर व वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ३० डिसेंबरपासून राज्यात कठोर निर्बंध लागू केले होते. मात्र, त्यानंतरही ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. त्याचप्रमाणे लग्नसमारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले.

दरम्यान, आता कोरोना नियंत्रणात आल्यामुळं राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यानुसार शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आली असून, आता अन्य निर्बंधही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून, आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल.

करमणूक पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने, उपाहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या २५ टक्के किंवा २००  लोकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा