Advertisement

Malad Building Collapse : एकाच कुटुंबातील ९ जणांवर काळाचा घाला

या दुर्घटनेत राहणाऱ्या राफिक यांच्या कुटुंबावर काळानं घाला घातला.

Malad Building Collapse : एकाच कुटुंबातील ९ जणांवर काळाचा घाला
SHARES

मुंबईत (Mumbai rains) झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका ३ मजली इमारतीचा (Malad Building Collapse) काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ९ जणांचा समावेश आहे.

या दुर्घटनेत राहणाऱ्या राफिक यांच्या कुटुंबावर काळानं घाला घातला. राफिक यांच्यासह त्यांची पत्नी रईसा बानो आणि घरातील ६ चिमुरडे ढिगाऱ्याखाली सापडले. तर राफिक यांचा भाऊ आणि त्याची पत्नीसुद्धा ढिगाऱ्याखाली अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. राफिक यांच्या कुटुंबातील ६ चिमुरड्यांचा यात मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील एकूण ९ जणांचा यात मृत्यू झाला.

मृतांमध्ये साहिल सर्फराज सय्यद वय ९ वर्ष, तर अरिफा शेख या ८ वर्षांच्या चिमुरड्यांचा मृत्यू झाला. तर ३ आणि ५ वर्षांच्या चिमुरडीचा सुद्धा यात समावेश आहे. एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ९ जण हे राफिक यांच्या कुटुंबातील होते.

मुंबई महापालिकाने मृतांसह गंभीर जखमींची यादी जाहीर केली आहे. या जखमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच सध्या दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

मालाड इमारत दुर्घटनेतील मृतांची यादी

  • साहिल सर्फराज सय्यद (पु) – ९ वर्ष
  • अरिफा शेख- ८ वर्ष
  • अज्ञात (पु) – ४० वर्षे
  • अज्ञात (पु)- १५ वर्षे
  • अज्ञात (स्त्री)- ८ वर्षे
  • अज्ञात (स्त्री) – ३ वर्षे
  • अज्ञात (स्त्री) – ५ वर्षे
  • अज्ञात (स्त्री) – ३० वर्षे
  • अज्ञात (स्त्री) – ५० वर्षे
  • अज्ञात (पु) – ८ वर्षे

जखमींची नावं

  • मरी कुमारी रंगनाथ- वय वर्ष ३०
  • धनलक्ष्मी बेबी- वय वर्ष ५६ (प्रकृती स्थिर)
  • लीम शेख- वय वर्षे ४९ (प्रकृती स्थिर )
  • रिजवाना सय्यद- वय वर्ष ३३ (प्रकृती स्थिर)
  • सूर्य मनी यादव- वय वर्षे ३९ (प्रकृती स्थिर)
  • करीम खान वय वर्ष- ३० (प्रकृती स्थिर)
  • गुलजार अहमद अन्सारी- वय वर्ष २६ (प्रकृती स्थिर)



हेही वाचा

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर

पुण्याच्या केमिकल कंपनीच्या मालकाला अटक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा