मुंबईला (mumbai) भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपाकी वाढती गर्दी ही एक मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस मुंबईतील लोकसंख्या वाढत आहे. याचाच ताण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडतो. याचाच परिणाम की मुंबई लोकल ट्रेनमध्ये देखील गर्दीचे (rush) प्रमाण जास्त होत आहे.
मुंबई लोकल ट्रेनमधील (local train) गर्दीची अनेक उदाहरणे आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत असतो, ज्यात मुंबई लोकलमध्ये लक्षणीय गर्दी दिसते. बऱ्याचदा गर्दीमुळे ट्रेनमधून पडल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा आणि उतरण्याचा असा प्रवाशांचा रोजचा संघर्ष दिसत आहे.
@gharkekalesh ने हा व्हिडिओ मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. “स्पिरिट ऑफ मुंबई काइंड अ कलेश” असे कॅप्शनसह पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
Spirit of Mumbai Kinda Kalesh pic.twitter.com/Y0D8Fzq17M
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 5, 2024
व्हिडिओमध्ये, एक माणूस लोकलच्या गर्दीतून (mumbai local) बाहेर पडण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. संघर्ष करून आणि आक्रमकपणे मार्ग काढत असताना प्रवाशांचा ट्रेनमध्ये चढणारा लोेंढा त्या व्यक्तीला आत घेऊन जात आहे.
लोकांची गर्दी होत असताना तो ट्रेनमधून (trains) पडल्याची घटना घडली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. घटनेची तारीख आणि नेमके ठिकाण निश्चित होऊ शकले नाही.