Advertisement

दिंडोशी न्यायालयात न्यायाधीशांवर भिरकावली बासरी, आरोपीला अटक

बोरीवली विभागातील दिंडोशी सेशन कोर्टात वकिलाच्या वेशात येऊन एका व्यक्तीने न्यायाधीशांच्या अंगावर लोखंडी बासरी फेकल्याची घटना घडली.

दिंडोशी न्यायालयात न्यायाधीशांवर भिरकावली बासरी, आरोपीला अटक
SHARES

बोरीवली विभागातील दिंडोशी सेशन कोर्टात वकिलाच्या वेशात येऊन एका व्यक्तीने न्यायाधीशांच्या अंगावर लोखंडी बासरी फेकल्याची घटना घडली. या प्रकारानंतर न्यायालयात एकच गोंधळ उडाला. ओमकार पांडे (६०) असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं. 

दिंडोशी सत्र न्यायालयातील एस. यु. बघेले यांच्या कोर्ट क्रमांक १० मध्ये गुरूवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका खटल्यावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी वकिलाच्या वेशातील ओमकार पांडेने दंडाधिकारी न्यायाधीश एस. यु. बघेले यांच्यावर लोखंडी बासरी भिरकावली. ही बासरी न्यायाधीशांना न लागता त्यांच्या शेजारील व्यक्तीला लागली. मात्र, यात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाली. बासरी भिरकावणाऱ्या पांडेला पोलिसांनी अटक केली.

 ओमकार पांडे साकीनाका येथील रहिवासी आहे. श्रीकृष्णाचा वाढदिवस असल्यानं न्यायाधीशांना बासरी भेट देण्यासाठी बासरी त्यांच्याकडे फेकल्याचा युक्तीवाद त्याने केला आहे. पांडे २०१७ मध्ये साकीनाका येथे झालेल्या खुनाचा साक्षीदार आहे. त्याला न्यायालयाकडून वारंवार साक्षीसाठी बोलावण्यात येत होतं. मात्र, तो न्यायालयात हजर राहत नव्हता. अखेर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध समन्स बजावलं. त्यानंतर ओमकार पांडे वकिलाचा कोट घालून न्यायालयात आला आणि त्याने न्यायाधीशांवर बासरी भिरकावली. 

या घटनेनंतर दिंडोशी सत्र न्यायालयातील सुरक्षितेत वाढ करण्यात आली आहे. यापुढे दिंडोशी न्यायालयात येणाऱ्या वकिलांचीही त्यांच्या सामानासह कसून तपासणी करण्याचे आदेश सत्र न्यायालयाचे अतिरिक्त प्रमुख न्यायाधीश एस. एम. शर्मा यांनी दिले आहेत.



हेही वाचा -

नोकरीहून काढल्याने कांदिवलीत महिलेची आत्महत्या

अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या वकिलाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा