मुंबईत आता दोन मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. साध्या सुती कापडाचे मास्क वापरणाऱ्यांनी या मास्कच्या आत ‘सर्जिकल’ अर्थात वैद्यकीय उपचारांदरम्यान लावण्यात येणारा मास्क वापरावा असं आवाहन मुंबई महापालिकेने केलं आहे.
एन ९५ मास्क व वैद्यकीय मास्कमुळे ९५ टक्के संरक्षण मिळते. तर सुती मुखपट्टीमुळे शून्य टक्के संरक्षण मिळते, असा दावाही पालिकेच्या ‘माय बीएमसी’ या अधिकृत ‘ट्विटर हॅण्डल’वरून करण्यात आला आहे. नागरिकांनी मात्र पालिकेच्या या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. एन ९५ मास्कची जाहिरात यातून करायची आहे का, तसंच एक मास्क लावून वावरणेही जिकिरीचे होत असताना दोन मास्क लावून कसं वावरायचं, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
पालिकेने यावर म्हटलं आहे की, सुती कापडाचे मास्क वापरणं वापरणंही सुरक्षित आहे. मात्र अनेक नागरिक मास्क काढून वावरत असल्याने किंवा त्याचा योग्य वापर करीत नाहीत. त्यामुळे मास्कच्या आत आणखी एक मास्क वापरणं आवश्यक आहे.
पालिकेने गेल्या एप्रिलपासून मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. ऑक्टोबरमध्ये पहिली लाट ओसरल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली. पालिकेने आतापर्यंत २७ लाख लोकांवर कारवाई करून ५४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
हेही वाचा -
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १२०० रुपये दंड
१८-४४ वयोगटातील व्यक्तीचं लसीकरण पालिकेच्या 'या' ५ केंद्रातच, पण...