Advertisement

मुसळधार पावसामुळं मुंबईतलील अनेक परिसर अंधारात

गेल्या ४ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली.

मुसळधार पावसामुळं मुंबईतलील अनेक परिसर अंधारात
(Image: Twitter/ Dr Rahul Baxi)
SHARES

गेल्या ४ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं मुंबईची तुंबई झाली. पावसाच्या तुफान बॅटींगमुळं मुंबईचे रस्ते जलमय झाले असून, अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. यामुळं अनेकांचं जगणं कठीण झालं होतं. सर्वत्र घरभर पाणी साचलं होतं. शिवाय, याचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला. याच कारण म्हणजे पाणी साचल्यानं अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत होता.

मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं वीजपुरवठा खंडीत झाला. परिणामी मुंबईकरांना काही काळ हा अंधारात काढावा लागला. मात्र, नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी बेस्टच्या विद्यूत पुरवठा विभागानं तातडीनं संबंधित परिसरातील वीजपुरवठा सुरू केला.

दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होते. याच कारण म्हणजे पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी रस्त्यांच्या दुरूस्तीचं काम केलं जातं. शिवाय, भूमीगत कामं ही मोठ्या प्रमाणात केली जातात. त्यामुळं याचा फटका हा विद्यूत पुरवठ्यावर होते. त्यामुळं पावसाळ्यात पाणी साचल्यास संबंधित परिसरातील वीजपुरवठा हा खंडित होतो.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा