Advertisement

विमानतळ आणि विमानात मास्क घालणं बंधनकारक

महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती रद्द केली आहे. पण विमानतळावर अद्याप मास्क घालणं बंधनकारक आहे.

विमानतळ आणि विमानात मास्क घालणं बंधनकारक
SHARES

महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारनं नुकतीच मास्कमुक्ती केल्याचं जाहीर केलं होतं. पण एअरपोर्ट आणि फ्लाइटमध्ये मास्क लावणं बंधनकारक आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, आताही विमान प्रवासादरम्यान मास्क घालण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंबई किंवा दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांनी सोबत मास्क ठेवणं विसरू नये. शहरांतील सर्व विमाननतळांवर हा नियम लागू आहे.

गेल्या वर्षी मार्चमध्ये नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं (डीजीसीए) म्हटलं होतं की, फ्लाइटमध्ये मास्क घालण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला अनुशासनहीन प्रवासी मानले जाईल आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना विमानात प्रवेश नाकारला जाईल.

महाराष्ट्र सरकारनं गुढीपाडव्यानिमित्त राज्यात मास्क घालण्याची सक्ती हटवली आहे. यासह, मास्क न घातल्यास तुमच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही.



हेही वाचा

ॲपआधारित टॅक्सींना तात्पुरत्ये ॲग्रीगेटर लायसन्स देणार

लोकल प्रवासासाठी लसीकरणाचे दोन डोस आवश्यक नाही, पण...

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा