Advertisement

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग

भिवंडीत एका कारखान्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे आग वेगाने पसरली.

भिवंडीत यंत्रमाग कारखान्याला भीषण आग
SHARES

भिवंडीत एका कारखान्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा असल्यामुळे आग वेगाने पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरात यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्याला लागूनच रहिवासी परिसर असल्यामुळे एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे काम सुरू आहे.



हेही वाचा -

राज्यभरात फटाकेबंदीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाकडून अमान्य

कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी लवकरच, सीरमकडून घोषणा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा