Advertisement

पवईत म्हाडाच्या इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात, पण...

२ ते ३ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. पण...

पवईत म्हाडाच्या इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात, पण...
SHARES

पवईतील म्हाडा कॉलनीत एका रहिवासी इमारतीला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. २ ते ३ तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे.

पवईतील हिरापन्ना मॉलसमोर म्हाडा कॉलनी आहे. या म्हाडा कॉलनीतील एनटीपीसी इमारतीच्या सहाव्या माळ्यावर एका घरात भीषण आग लागली. ही आग वाढत गेली. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या.

सोसायटीतल्या एका घरातील एसी कोमपेसरमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागल्याचं समोर येत आहे. सध्या या इमारतीतील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. आगीत आतापर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.हेही वाचा

शीतल आमटे यांची आत्महत्या, जाणून घ्या त्यांचा प्रवास

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ दुधाचा टँकर उलटला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय