Advertisement

मुंबईतील कमाल तापमानात घट

मागील शुक्रवारपासून मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात ६ अंशाची वाढ झाली होती.

मुंबईतील कमाल तापमानात घट
SHARES

मुंबईमध्ये शुक्रवारपासून वाढत असलेल्या कमाल तापमानात गुरुवारी काही अंशानी घट नोंदविण्यात आली. पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता नसून, ते सरासरीपेक्षा १ ते २ अंश कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मागील शुक्रवारपासून मुंबई शहर आणि उपनगरातील कमाल तापमानात ६ अंशाची वाढ झाली होती.

४ दिवसात कमाल तापमान ३० अंशावरून ३६ अंशावर पोहचलं. त्यामुळे दिवसा उकाडा वाढला होता. बुधवारपासून त्यामध्ये घट होऊ लागली. गुरुवारी सांताक्रूझ केंद्रावर ३१.४ अंश, तर कुलाबा केंद्रावर ३०.४ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आलं.

मागील ४ दिवसांमध्ये किमान तापमान २ ते ३ अंश वाढून २० अंशापेक्षा अधिक नोंदवलं जात होतं. त्यामध्ये घट झाली असून, गुरुवारी सांताक्रूझ इथं १८.५ अंश, तर कुलाबा इथं २०.५ अंश किमान तापमान नोंदविण्यात आलं.



हेही वाचा -

महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री; उद्धव ठाकरेंना प्रस्ताव मान्य?

महाराष्ट्र काँग्रेसला मिळणार नवं नेतृत्व?, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा