Advertisement

महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री; उद्धव ठाकरेंना प्रस्ताव मान्य?

काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यापाठोपाठ सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्येही काही बदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री; उद्धव ठाकरेंना प्रस्ताव मान्य?
SHARES

काँग्रेस नेते आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यापाठोपाठ सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्येही काही बदल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष करून विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेकडे जाऊन त्याबदल्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळेल असं म्हटलं जात आहे. तसं झाल्यास महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळू शकतात.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांच्याकडे सद्यस्थितीत काँग्रेसचं (congress) प्रदेशाध्यक्षपद, विधीमंडळ नेता आणि महसूल मंत्रीपद अशा तीन जबाबदाऱ्या आहेत. काँग्रेस महाराष्ट्रातील सत्तेत सामील झाल्यापासून पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. यापुढच्या काळात येऊ घातलेल्या निवडणुकांकडे पाहता पक्षाला आणखी मजबूत करणारा, पक्षकार्यासाठी पूर्णवेळ देऊ शकणारा अध्यक्ष हवा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांकडून होऊ लागली होती. ही जबाबदारी स्वीकारण्यास नाना पटोले देखील इच्छुक होते. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वात बदल होईल, असे तर्क लावण्यात येत होते. 

हेही वाचा- मनसे पक्ष आहे की टोळी? आदित्य ठाकरेंची बोचरी टीका

त्यानुसार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने लवकरच त्यांची महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. परंतु विधानसभा अध्यक्ष पदाच्या रिक्त खुर्चीवर काँग्रेसचाच नेता बसणार की शिवसेना अथवा राष्ट्रवादीकडून कोण त्यावर दावा ठोकणार हे अजूनही स्पष्ट नाही. 

तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद हवं असून त्या बदल्यात आणखी एक उपमुख्यमंत्री पद तयार करून ते काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा होकार असल्याचंही कळत आहे. परंतु राष्ट्रवादी त्यावर आक्षेप घेणार का हा खरा प्रश्न आहे.

काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद गेल्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री नितीन राऊत किंवा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार या तिघांपैकी एकाला हे पद मिळू शकतं, असं म्हटलं जात आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी काँग्रेससाठी दुसरं उपमुख्यमंत्रीपद तयार करण्यात येणार, या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

(congress might get second deputy cm post in maharashtra)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा