Advertisement

औषध दुकानांचा आज संप, या ठिकाणी मिळतील औषधं


औषध दुकानांचा आज संप, या ठिकाणी मिळतील औषधं
SHARES

औषधांच्या उत्पादन-खरेदी-विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी ई-पोर्टल सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात ऑल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट (एआयओसीडी)ने देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यानुसार सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून या संपाला सुरूवात होणार आहे. मुंबईसह देशभरातील सुमारे साडेआठ लाख औषध दुकानांचे शटर रात्री 12 वाजल्यापासून बंद होईल, अशी माहिती 'एआयओसीडी'चे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर मुंबईसह राज्यातील फार्मासिस्ट मालकांनी बंदमध्ये सहभागी न होण्याची निर्णय घेतल्याने राज्यातील 50 टक्के औषध दुकाने खुली राहतील, असा दावा 'महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन'चे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी केला आहे.


हेही वाचा

बंदवरून औषध विक्रेत्यांमध्ये फूट; 30 मे रोजी 25 हजार दुकाने खुली राहणार?


शिंदे यांनी मात्र हा दावा फेटाळत बंद 100 टक्के यशस्वी ठरेल असा पुनरूच्चार केला आहे. दरम्यान बंदच्या काळात रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी 'एआयओसीडी'ने मुंबईसह राज्यभर काही औषध दुकाने खुली ठेवली असून अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)नेही रूग्णालयांमधील औषध दुकाने 24 तास खुली ठेवण्याच्या सूचना रूग्णालयांना केल्याची माहिती 'एफडीए' आयुक्त डाॅ. हर्षदिप कांबळे यांनी दिली आहे.

रात्री 12 वाजल्यापासून बंद सुरू होणार असल्याने रुग्णांनी अत्यावश्यक औषधांची खरेदी करुन ठेवावी, असे आवाहन 'एआयओसीडी' आणि 'एफडीए'ने केले आहे. दरम्यान औषध विक्री ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडत असल्याने विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवू नये, त्याचा रूग्णांना फटका बसेल, अशा आशयाचे पत्र 'एआयओसीडी'ला पाठवल्याची माहिती डाॅ. कांबळे यांनी दिली आहे. तर 'हे पत्र मिळाले असून ई-पोर्टलचा निर्णय त्वरीत मागे घ्या, आम्ही बंद मागे घेतो', अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे.

30 मे रोजी मुंबईकरांना इथे मिळतील औषधे -

  • बाॅम्बे हाॅस्पीटल फार्मसी
  • सहकारी भंडार, मोहम्मद अली रोड
  • अपोलो फार्मसी, काळाघोडा
  • नूर हाॅस्पीटल फार्मसी
  • सैफी हाॅस्पीटल फार्मसी
  • जसलोक हाॅस्पीटल फार्मसी
  • ब्रीज कॅण्डी हाॅस्पीटल फार्मसी
  • हिंदूजा हाॅस्पीटल फार्मसी, दादर
  • केईएम हाॅस्पीटल फार्मसी, परळ
  • एसएल रहेजा हाॅस्पीटल फार्मसी, माहीम
  • लिलावती हाॅस्पीटल फार्मसी, वांद्रे पश्चिम
  • होली फॅमिली हाॅस्पीटल फार्मसी, वांद्रे पश्चिम
  • गुरूनानक हाॅस्पीटल फार्मसी, वांद्रे पूर्व
  • नानावटी हाॅस्पीटल फार्मसी, पार्ले
  • कोकीलाबेन हाॅस्पीटल फार्मसी, अंधेरी
  • सेव्हन हिल्स हाॅस्पीटल फार्मसी, मरोळ
  • ब्रम्हकुमारी हाॅस्पीटल, अंधेरी
  • श्रीश्याम एन्टरप्रायझेस, कपाडीया हाॅस्पीटल, गोरेगाव
  • करूणा हाॅस्पीटल, बोरीवली
  • नायर हाॅस्पीटल, मुंबई सेंट्रल
  • सायन हाॅस्पीटल, सायन
  • टाटा हाॅस्पीटल, परळ
  • पारेख हाॅस्पीटल, गोदरेज हाॅस्पीटल, विक्रोळी
  • सुराना सेठीया हाॅस्पीटल, कुर्ला
  • सोमय्या हाॅस्पीटल, चुनाभट्टी

औषधे मिळत नसल्यास वा औषधे कुठे मिळतील याची माहिती घेण्यासाठी 'एफडीए'शी येथे संपर्क साधा -

टोल फ्री नंबर - 1800222365, 022-26592362

अधिकाऱ्याचे नाव - भ्रमणध्वनी क्रमांक - कार्यक्षेत्र :

  • पी. पी. महानवर (सहायक आयुक्त परि-1) - 9967447069 - कुलाबा, माझगाव, भायखळा, मस्जिद, चर्नीरोड, चर्चगेट, प्रिन्सेस स्ट्रीट, मरीन लाईन्स, भुलेश्वर

  • पी. एच. महानवर (सहायक आयुक्त परि-2) - 9967447068 - दादर, वरळी, लोअर परळ, एल्फिन्स्टन, भायखळा, माहीम, माटुंगा, ग्रॅन्ट रोड, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, वडाळा, धारावी, शिवडी

  • जे. बी. मंत्री (सहायक आयुक्त परि-4) - 9967439862 - मुलूंड, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, साकीनाका, पवई, वांद्रे, खार

  • जे. बी. मंत्री (सहायक आयुक्त परि-3) - 9967439862 - घाटकोपर, विद्याविहार, चेंबूर, कुर्ला, सायन, गोवंडी, मानखुर्द, ट्राॅम्बे

  • डी.एस. सिद (सहायक आयुक्त परि-5) - 9819807759 - अंधेरी, सांताक्रूझ, विलेपार्ले, जुहू

  • व्ही. एस. सिंघवी (सहायक आयुक्त परि-6) - 9992832814 - जागेश्वरी, गोरेगाव, मालाड

  • डी. एस. सिद (सहायक आयुक्त परि-7) 9819807759 - कांदिवली, बोरिवली, दहिसर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा