Advertisement

पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार ७३० दिवसांची 'बालसंगोपन रजा'

आतापर्यंत ही सुटी केवळ महिला कर्मचाऱ्यांनाच मिळत होती. मात्र, केंद्र सरकारनं ही रजा 'सिंगल फादर' असेलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना दिल्यामुळं असे कर्मचारी सेवेच्या पूर्ण कार्यकाळात एकूण ७३० दिवसांची 'सीसीएल' घेऊ शकतात.

पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार ७३० दिवसांची 'बालसंगोपन रजा'
SHARES

केंद्र सरकारनं सिंगल पेरेंट पुरुष कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांसाठी 'चाईल्ड केअर लिव्ह' (सीसीएल) अर्थात 'बाल संगोपन रजा' देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही सुटी केवळ महिला कर्मचाऱ्यांनाच मिळत होती. मात्र, केंद्र सरकारनं ही रजा 'सिंगल फादर' असेलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना दिल्यामुळं असे कर्मचारी सेवेच्या पूर्ण कार्यकाळात एकूण ७३० दिवसांची 'सीसीएल' घेऊ शकतात.


वेतन आयोगात शिफारस

सातव्या वेतन आयोगात पुरुष सिंगल पेरेंटबाबत शिफारस करण्यात आली होती. त्याआधारे हे नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. सातव्या वेतन आयोगात सिंगल पेरेंट कर्मचाऱ्यांबाबत नोंद घेण्यात आली होती. यामध्ये पुरुष सिंगल पॅरेंटमध्ये विदूर आणि घटस्फोटीत पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे.


'असा' मिळेल पगार

याबाबत कर्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सूचना केल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या 'सीसीएल' सुट्यांमधील पहिल्या ३६५ दिवसांमध्ये पूर्ण पगार आणि उर्वरीत ३६५ दिवसांच्या सुट्यांमध्ये ८० टक्के पगार देण्याची शिफारस करण्यात आली आहे.हेही वाचा-

Good News! सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागूRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा