Advertisement

Good News! सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

१ जानेवारीपासून राज्यात सातवा वेतन आयोग लागू होणार असून याचा फायदा राज्यभरातील १७ लाख कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठी ५ ते १४ हजारांची वाढ होणार आहे.

Good News! सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
SHARES

राज्यभरातील सरकारी कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून ज्या खूशखबरीची वाट पाहत होते ती खूशखबर अखेर नववर्षाच्या भेटीच्या रूपानं या कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला गुरूवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मंजुरीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ ते १४ हजार रुपयांची वाढ होणार आहे.


आंदोलनाचा इशारा

गेल्या कित्येक महिन्यांपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती. मात्र या मागणीकडे सरकार कानाडोळा करत असल्यानं या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचाही इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर अखेर सरकारनं गुरूवारी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.


२१ हजार कोटींचा बोजा

१ जानेवारीपासून राज्यात सातवा वेतन आयोग लागू होणार असून याचा फायदा राज्यभरातील १७ लाख कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. तर कर्मचाऱ्यांच्या पगारात आता मोठी ५ ते १४ हजारांची वाढ होणार आहे. परिणामी राज्याच्या तिजोरीवर सुमारे २१ हजार कोटींचा बोजा पडणार आहे.हेही वाचा-

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खूशखबर; १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू

सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार, मागण्यांवर तोडगा नाहीचRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा