Advertisement

दूध १० ते १५ रुपयांनी महागणार? प्लास्टिक बंदीचा फटका

दूध संकलनाचा प्रश्न एेरणीवर आल्यानं दूध उत्पादकांनी दूधासाठी प्लास्टिक बंदी शिथील करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. पण सरकारकडून या मागणीवर अजूनही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपयांचं अनुदान अजूनही मिळत नसल्याचं चित्र आहे.

दूध १० ते १५ रुपयांनी महागणार? प्लास्टिक बंदीचा फटका
SHARES

राज्य सरकारच्या प्लास्टिक बंदीचा फटका मुंबईसह राज्यभरातील दूध ग्राहकांना बसण्याची शक्यता आहे. दूधविक्रीसाठी प्लास्टिक बंदी लागू केल्यास दूध बाटलीतून देण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळं दूध बाटलीतून विकावं लागल्यास बाटलीतील दुधासाठी प्रतिलिटर १० ते १५ रुपये जादा दर आकारण्याचा निर्णय राज्य दूध कल्याणकारी खासगी दूध उत्पादकांनी घेतला आहे. तर दुधाच्या पिशव्या बनवणाऱ्या उत्पादकांना सवलत देण्यात येणार असल्याने दूध उत्पादकांनी सरकारला धमक्या देऊ नये, असं पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी ठणकावलं आहे.


आराखडा बनवण्याचे आदेश

राज्य सरकारनं प्लास्टिक बंदी लागू केली असून त्याअंतर्गत दूधाच्या पिशव्यावरही बंदी येणार आहे. त्यानुसार दुधाच्या पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तसंच दुधाच्या पिशव्यांच्या पुनर्वापरासंबंधीचा आराखडा सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले होते. पण या आदेशानुसार 'द महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन' हा आराखडा निश्चित वेळेत सादर करू शकलेले नाहीत.


उत्पादन बंद करण्याचा निर्णय

त्यामुळं प्रदूषण मंडळानं असोसिएशनला प्लास्टिक पिशव्यांचं उत्पादन बंद करण्यासंबंधी नोटीस बजावली आहे. या नोटीशीनुसार असोसिएशनने १५ डिसेंबरपासून डेअरी उद्योगाला प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना दूध कसं पोहोचवायचं? असा प्रश्न दूध उत्पादकांसमोर उभा ठाकला आहे.


अनुदानाचा प्रश्नही प्रलंबित

दूध संकलनाचा प्रश्न एेरणीवर आल्यानं दूध उत्पादकांनी दूधासाठी प्लास्टिक बंदी शिथील करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आंदोलनाचाही इशारा दिला आहे. पण सरकारकडून या मागणीवर अजूनही काही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यातच दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपयांचं अनुदान अजूनही मिळत नसल्याचं चित्र आहे. ३० आॅक्टोबरपासून अनुदानाची रक्कच आलेली नसल्यानं सव्वादोनशे कोटी रुपयांची बिल थकीत आहेत. या दोन्ही बाबी लक्षात घेता आक्रमक दूध उत्पादकांनी गुरूवारी बैठक घेत दूध दरवाढीचा इशारा दिला आहे.


बैठकीचं आयोजन

प्लास्टिक बंद झाल्यास दूध बाटलीतूनच विकावं लागले. त्यामुळं बाटलीसाठी जादा पैसे ग्राहकांना मोजावे लागतील असं दूध उत्पादकांचं म्हणणं आहे. दूध उत्पादकांच्या या निर्णयावर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दूध दरवाढीच्या धमक्या देऊ नये असा प्रतिइशारा दूध उत्पादकांना दिला आहे. तर यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी दूध उत्पादकांची बैठक बोलावल्याचंही कदम यांनी सांगितलं आहे.हेही वाचा- 

दूध ५ रुपयांनी महागणार?

१५ डिसेंबरपासून दुधाच्या पिशव्या बंदRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा