दूध ५ रुपयांनी महागणार?

आॅगस्टनंतरची अनुदानाचा रक्कम आतापर्यंत दूध उत्पादकांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळं सरकारनं पुन्हा एकदा दूध उत्पादकांच्या तोंडाला पानं पुसली असं म्हणत दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत. त्यांनी दुधाच्या किंमतीतच ५ रुपयांची वाढ करण्याचा विचार सुरू केला आहे.

SHARE

दूध उत्पादकांना ५ रुपयांचं अनुदान देण्याच्या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्यानं दूध उत्पादक किंमती वाढवण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.


आंदोलनानंतर आश्वासन

दुधाला योग्य हमीभाव मिळावा, कर्नाटकाच्या धर्तीवर दूध उत्पादकांच्या खात्यात दिवसाला ५ रुपये अनुदान जमा व्हावं, अशी मागणी करत दूध उत्पादकांनी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जुलैमध्ये मोठं आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारने दूध उत्पादकांना ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आॅगस्ट महिन्याची रक्कम दूध उत्पादकांना दिली.


तोंडाला पानं पुसली

पण, आॅगस्टनंतरची अनुदानाचा रक्कम आतापर्यंत दूध उत्पादकांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळं सरकारनं पुन्हा एकदा दूध उत्पादकांच्या तोंडाला पानं पुसली असं म्हणत दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत. त्यांनी दुधाच्या किंमतीतच ५ रुपयांची वाढ करण्याचा विचार सुरू केला आहे.


सरकारला इशारा

सरकारने १५ डिसेंबरपर्यंत अनुदान न दिल्यास या योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध संघाच्या प्रतिनिधींनी गुरूवारी दिला आहे. अनुदान योजनेतून बाहेर पडल्यास दुध उत्पादकांना दुधाचे दर वाढवण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे दुध ५ रुपयांनी महाग होण्याची शक्यता आहे.हेही वाचा- 

१५ डिसेंबरपासून दुधाच्या पिशव्या बंद

गंभीर! डेअरीमध्येच होतेय दूधभेसळ

भेसळखोरांना आता जन्मठेपेची शिक्षासंबंधित विषय
ताज्या बातम्या