Advertisement

गिरणी कामगारांचे 'चलो, आझाद मैदान' आंदोलन


गिरणी कामगारांचे 'चलो, आझाद मैदान' आंदोलन
SHARES

गिरणी कामगारांचा गेल्या कित्येक वर्षापासून हक्काच्या घरासाठी लढा सुरू आहे. मात्र तरीही हक्काच्या घराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही.
टप्प्याटप्प्यात जशी घरे निर्माण होत आहेत, तशी ती कामगारांना दिली जात आहेत. पण तरीही सर्व गिरणी कामगारांना हक्काची घरे देणे शक्य होणार आहे असाच प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सर्व गिरणी कामगारांना घरे देण्याच्या दृष्टीने सरकारकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही.


गिरणी कामगार करणार आंदोलन

एकीकडे धोरण ठरवण्याची मागणी होत आहे. पण सरकारकडून मात्र या मागणीकडे कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे आता या सरकारला जागे करण्यासाठी गिरणी कामगारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार 28 जुलैला गिरणी कामगार एकजूट तर 1 ऑगस्टला गिरणी कामगार संघर्ष समिती आझाद मैदानावर धडकणार आहे.


सरकारचे लक्षच नाही?

19 गिरण्यांच्या जागेवरील अंदाजे 6,995 तर 6 गिरण्यांच्या जागेवरील 2,634 घरांसाठी याआधी लॉटरी काढण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या 2,417 भाडेतत्वावरील घरांसाठीही म्हाडाच्या माध्यमातून लॉटरी काढण्यात आली आहे.

यापुढे म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या वा उपलब्ध होणाऱ्या जमिनीच्या माध्यमातून जेमतेम आणखी 20 ते 25 हजार कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यामुळे अंदाजे एक लाख कामगारांना घरे कुठून आणि कशी देणार? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणूनच गिरणी कामगार एकजूटकडून यासंबंधीचे धोरण जाहीर करण्याची मागणी होत आहे. पण सरकार काही केल्या याकडे लक्ष देत नसल्याने 28 जुलैला राज्यभरातील गिरणी कामगार मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धडकणार असल्याची माहिती गिरणी कामगार कल्याणकारी संघाच्या चेतना राऊत यांनी दिली आहे.


गिरणी कामगारांना हक्काची घरे देण्यासाठी ज्या वेगाने कामे व्हायला हवीत, त्या वेगात ही कामे होत नाहीत. गिरणी कामगारांना कशी आणि कुठे घरे देणार? याविषयीही सरकारकडून ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे कामगारांमध्ये रोष असून हा रोष 1 ऑगस्टला आझाद मैदानावर दिसेल.

दत्ता इस्वलकर, अध्यक्ष, संघर्ष समिती


1 ऑगस्टला मोर्चा

गिरणी कामगार संघर्ष समिती आणि अन्य संघटनांनी 1 ऑगस्ट रोजी 'चलो आझाद मैदान' अशी हाक दिली आहे. 1 ऑगस्टचा मोर्चा हा प्रचंड मोठा असणार असून राज्यभरातील गिरणी कामगार यात सहभागी होणार आहेत.




हेही वाचा -

म्हाडा कार्यालयावर गिरणी कामगारांचा मोर्चा

गिरणी कामगारांच्या घरांसाठी आता अतिरिक्त जागा


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा