Advertisement

घरातील सिलिंगचा भाग कोसळल्यानं एकाचा मृत्यू

मीरा भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला.

घरातील सिलिंगचा भाग कोसळल्यानं एकाचा मृत्यू
SHARES

मीरा भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

भाईंदर पश्चिमेच्या रोज विल्ला इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर घरातील सिलिंगचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कॅमी ब्रिटो हे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

रोज विल्ला इमारतीमधील सिलिंग कोसळल्याची घटना पुढे आल्यानंतर मीरा भाईंदर महानगरपालिकेचं अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी अग्निशमन दलानं पाहणी केली आहे.

नवी मुंबईतील नेरुळमध्येही इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. रात्रीच्यावेळी झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीच्या डोक्याला २२ टाके पडले आहेत. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी रात्री नेरुळ येथे ही घटना घडली.

मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात दोन दिवसांपूर्वीच इमारत कोसळल्यानं ११ जणांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांचा समावेश होता. तर ७ जण गंभीर जखमी झाले होते. मृतांमध्ये सहा लहान मुलांचा समावेश होता. ही सर्व मुले १० वर्षाच्या आतील आहेत.

खमींवर सध्या कांदिवलीतील शताब्दी आणि आजूबाजूच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मालाड मालवणी इथं इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसंच जखमीच्या उपचारांचा सर्व खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.



हेही वाचा

संजय गांधी नॅशनल पार्क सर्वांसाठी पुन्हा खुले, 'या' वेळेत जाण्याची परवानगी

मुंबईचा डबेवाला लवकरच सुरू करणार सेंट्रल किचन, 'अशी' आहे योजना

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा