Advertisement

वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणं चुकीचं - उच्च न्यायालय


वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणं चुकीचं - उच्च न्यायालय
SHARES

कधी सिग्नल तोडण्यावरून, तर कधी हेल्मेट न घालण्यावरून किंवा सीट बेल्ट न लावण्यावरून वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वाद होतात. खरेतर वाहतूक पोलिसांवर रस्त्यावर उभं राहून लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असते. अशात वाहतूक हवालदारांशी हुज्जत घालणे चुकीचं असल्याचं मत मुंबई उच्च न्यालयाने व्यक्त केलं आहे. हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराविषयी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत मांडलं.


तरच कायदा, सुव्यवस्था सुरळीत राहिल

ट्रॅफिक हवालदार अथवा पोलीस हवालदार हा पोलीस विभाग आणि सामान्य जनतेचा दुवा असतो. त्यांच्याबाबत जनतेच्या मनात आदर निर्माण करा, जनजागृती करा, असं मुंबई उच्च न्यालयाने सुनावणीदरम्यान म्हटलं आहे. ड्यूटीवर असलेल्या वाहतूक पोलीस आणि हवालदारांचा शब्द सर्वसामान्यांसाठी प्रमाण वाटायला हवा, तरच कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहिल, असंही मत न्यायालयानं व्यक्त केलं. यावेळी न्यायालयाने वाहतूक पोलिसांच्या परिस्थितीविषयी चिंताही व्यक्त केली.


इथे कायद्याचं पालन का होत नाही?

गुरुवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची गर्दी, पार्किंगची समस्या याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचं न्यालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितिन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर पार पडलेल्या या सुनावणीत न्यालयाने नागरिकांनाही नियमांचं पालन करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. परदेशात गेलेले भारतीय तिथे नियम पाळतात मग इथे कायद्याचं पालन का केलं जात नाही? असा जाबही न्यालयानं यावेळी विचारला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा