Advertisement

बीकेसी-वरळी सी लिंकदरम्यान दोन उड्डाणपूल

या उड्डाणपुलांमुळे बीकेसी ते वरळी सी लिंक जोडला जाणार आहे. तसंच धारावी ते सी लिंक दरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे

बीकेसी-वरळी सी लिंकदरम्यान दोन उड्डाणपूल
SHARES

वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते वरळी सी लिंकदरम्यान एमएमआरडीए दोन उड्डाणपूल उभारणार आहे. बीकेसी ते वांद्रे-वरळी सी लिंक हा पहिला उड्डाणपूल आणि वांद्रे-वरळी सी लिंक ते बीकेसी असे हे दोन उड्डाणपूल असणार आहेत. या दोन्ही उड्डाणपुलांसाठी १६३ कोटी रुपये खर्च येणार आहे. 

या उड्डाणपुलांमुळे बीकेसी ते वरळी सी लिंक जोडला जाणार आहे. तसंच धारावी ते सी लिंक दरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे. धारावी-सी लिंक दरम्यानची वाहतूक सुरळीत करण्यासाठी ३०० मीटर लांबीचा आणि १२ फूट रुंदीचा हा मार्ग आहे. एमएमआरडीएने या मार्गाचं ५१ टक्के काम पूर्ण केले आहे. पुढील वर्षात हा मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. तसंच एमएमआरडीए शीव-चेंबूर लिंक रोडला बीकेसी जोडणार आहे. या दोन मार्गांच्या बांधकामांसाठी ४९९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.१.३ किमीचा हा एलिव्हेटेड मार्ग एमटीएनएल जंक्शन ते एलबीएस उड्डाणपुलापर्यंत असेल. ३.८९ किमीचा एलिव्हेटेड मार्ग कुर्ला (कपाडिया नगर) ते वाकोलापर्यंत असेल. हा मार्ग चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडला जोडला जाणार आहे. 

याशिवाय तीन उन्नत मार्ग पुढील वर्षी पूर्ण होणार आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली आणि राजनोली पुलाच्या डाव्या बाजूकडील मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल. तसंच कल्याण-भिवंडी दरम्यान तिसरा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.



हेही वाचा -

पुरेश्या पाण्यासाठी मुंबईकरांना ४ वर्ष वाट पहावी लागणार

भाऊचा धक्का ते मांडवा प्रवास केवळ ४५ मिनिटांत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा