Advertisement

मनसेच्या महिला मोर्चात शालिनी ठाकरेंचे नेतृत्व


मनसेच्या महिला मोर्चात शालिनी ठाकरेंचे नेतृत्व
SHARES

एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 मुंबईकरांनी जीव गमावला. त्यामुळे मुंबईकरांचा रोजचा प्रवास सोयीचा व्हावा यासाठी मनसेकडून गुरुवार 5 ऑक्टोबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाला सर्वसामान्य मुंबईकर यांचा प्रतिसाद लाभावा यासाठी मनसे कार्यकर्ते गेल्या 4 दिवसांपासून लोकलमधून या मोर्चासाठी प्रचार करत आहेत. दरदिवशी मुंबईकरांना सुखाचा प्रवास आणि प्रवासाचे सुख घेता यावे यासाठी सर्वच विभागातून मनसे कार्यकर्ते एकत्र येऊन मोर्चात सहभागी होत आहेत.

अंधेरी आणि वर्सोवा विधानसभेतून 350 हून अधिक लोक या मोर्चात सहभागी होत आहेत. या मनसे कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचे काम या विभागातील विभाग प्रमुखांनी केले आहे. मोर्चासाठी लोकांनी एकत्र यायला सकाळी 9.30 पासून सुरुवात केली होती. या विभागाचे नेतृत्व मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे करणार होत्या. परंतु त्या मनसेच्या शिष्ठमंडळात असल्यामुळे अंधेरी स्टेशनला न येता परस्पर गाडीने पुढे निघून गेल्या. त्यामुळे विभागातील कार्यकर्त्यांनी या विभागातील लोकांचे स्टेशन ते मेट्रो सिनेमा असे नेतृत्व केले.


हेही वाचा - 

मोर्चाला गर्दी जमवायची कशी? मनसेची रेल्वे प्रवाशांना भावनिक साद


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा