Advertisement

कुणी ट्रेनने, तर कुणी बसने मोर्चास्थळी रवाना


कुणी ट्रेनने, तर कुणी बसने मोर्चास्थळी रवाना
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईतील सर्वच मनसे कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. हा मोर्चा खरचं यशस्वी होईल का? सरकारला जाग येईल का? आणि लोकलमधील सुविधा वाढतील का? हे तर येणारा काळच ठरवेल. 




माहीममधून महिला कार्यकर्त्यांसाठी बसची सुविधा

मनसेचा संताप मोर्चा यासाठी मुंबईसह उपनगरातून अनेक मनसे कार्यकर्ते सहभागी होत आहेत. यामध्ये महिलांप्रमाणे पुरुष कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. महिलांना मोर्चात सहभागी होताना त्रास होऊ नये, यासाठी माहीममधून मनसे कार्यकर्ते राजन पारकर यांनी महिला कार्यकर्त्यांसाठी विशेष बसची सुविधा केली आहे. १५० पेक्षा अधिक मनसे कार्यकर्ते माहीममधून या मोर्चात सहभागी झाल्या आहेत.



माहीमचे मनसे शाखा प्रमुख राजन पारकर म्हणाले, या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईकरांना आवाहन केेले आहे. आमच्या विभागातून उपशाखाअध्यक्ष नयन दवणे, रुपेश तांडेल, नवनीत वैद्य, शैला गायकवाड, सरिता पाटील यांच्यासह १५० कार्यकर्त्यांचा समावेश आहे. मोर्चाला येणाऱ्या महिलांना प्रवासाचा त्रास होऊ नये तसेच लोकलची गर्दी त्यांना सहन करावी लागू नये, यासाठी माहीम विभागातून विशेष बसची सोय केली आहे.


ट्रॅफिक नको म्हणून ट्रेनने प्रवास

मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी अंधेरी, खार, बोरीवली या ठिकाणच्या मनसे कार्यकर्त्यांनी मोर्चात १०.३० नंतर सहभाग घेतला. यापैकी बऱ्याच मोर्चेकऱ्यांनी ट्रॅफिकचा त्रास सामान्य मुंबईकरांना होऊ नये यासाठी मुंबईच्या लोकलने प्रवास केल्याचे चित्र पहायला मिळाले. अंधेरीसह दादर रेल्वे स्थानकात मनसे कार्यकर्त्यांची विशेष गर्दी पहायला मिळाली. 


हेही वाचा - 

LIVE: मनसेचा एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या निषेधार्थ धडक मोर्चा

मनसेच्या महिला मोर्चात शालिनी ठाकरेंचे नेतृत्व


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा