Advertisement

अवघ्या १४ मिनिटांत अख्ख मंत्रालय झालं रिकामं..!


अवघ्या १४ मिनिटांत अख्ख मंत्रालय झालं रिकामं..!
SHARES

वार बुधवार, सकाळचे ११.३०... मंत्रालय नियंत्रण कक्षातून अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिकेला अपघात झाल्याचा दूरध्वनी जातो आणि अवघ्या ५ मिनिटांत अग्निशमन दलाच्या २ गाड्या मंत्रालयात दाखल होतात. पुढच्या अवघ्या १४ मिनिटांत अत्यंत तातडीनं मंत्रालयाची मुख्य इमारत आणि विस्तारित इमारत रिकामी करण्यात येते.

हे सर्व वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मंत्रालयाला आग लागली की एखादी दुर्घटना घडली? पण असं काहीही झालेलं नाही. मंत्रालय अचानक रिकामं करण्यामागचं खरं कारण होतं 'मॉकड्रिल'.



मंत्रालयात एखादी आपत्कालीन घटना घडल्यानंतर कशा प्रकारे काळजी घ्यावी? याचं प्रात्याक्षिक म्हणून बुधवारी 'माॅकड्रिल' घेण्यात आलं. आपत्कालीन परिस्थितीत इमारतीतील ध्वनिक्षेपकावरून उद्घोषणा होताच प्रत्येक मजल्यावरून बाहेर पडण्याचे निर्देश सर्व कर्मचाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आले होते.

या निर्देशांचं पालन योग्य प्रकारे होतं की नाही, यासाठी या मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आलं होतं. या सर्व मॉकड्रिलवर मंत्रालय नियंत्रण कक्षातून गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवून होत्या.



सकाळी साडेअकरा वाजता सायरन वाजल्यानंतर मंत्रालय नियंत्रण कक्षातून अग्निशमन दल आणि १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेला फोन गेला. ५ मिनिट ४० सेकंदात अग्निशमन दलाच्या दोन गाड्या मंत्रालयात दाखल झाल्या. त्यानंतर तिसरी गाडी दाखल झाली. अग्निशमन दलाचे एकूण २ पथक मंत्रालयात तातडीने दाखल झाले. १०८ रुग्णवाहिका मंत्रालयातच उपस्थित असल्याचा संदेश मिळाला. 

त्याच वेळी संपूर्ण इमारतीत असलेल्या ध्वनीवर्धकावरून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर एकाच वेळी दोन्ही इमारतीतील वरच्या मजल्यावरून ते खालच्या मजल्यापर्यंत अशा क्रमाने उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी पायऱ्यांवरून खाली उतरले. १४ मिनिटांमध्ये दोन्ही इमारती संपूर्ण रिकामे झाल्याचे आणि त्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, दिवे बंद असल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला मिळाला.

यावेळी पाचव्या मजल्यावर असलेले गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील हे स्वतःही पाचव्या मजल्यावरून खाली उतरून आले होते. त्यांनीही या संपूर्ण तालीमीची पाहणी केली. कुठलाही गडबड, गोंधळ न होता हा मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडला.



हेही वाचा - 

मंत्रालय झाले कॉर्पोरेट, गळ्यात दिसणार एन्ट्री पास!

मंत्रालयाच्या दारातच गुटखाबंदीचा पर्दाफाश



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा