Advertisement

मुलुंडमध्ये माकडांचा उच्छाद


मुलुंडमध्ये माकडांचा उच्छाद
SHARES

माकडे म्हटले की प्रत्येकाला गंमत वाटतेच. पण सध्या हीच गंमत मुलुंडमध्ये मात्र थोडी काळजीची ठरत आहे. कारण मुलुंड रेल्वे स्थानकाशेजारी पश्चिमेकडील इमारतींमध्ये काही माकडांनी उच्छाद मांडला आहे.


ही माकडे इमारतीच्या गच्चीवर तसेच घरांच्या पत्र्यावर चांगलाच दंगा करत आहेत. संख्येने 5 ते 6 असलेली माकडे मुलुंडला लागूनच असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून आली आहेत. अद्याप यांच्यामुळे कोणती दुर्घटना किंवा कोणाला इजा झाली नसली तरी परिसरात चांगलीच धांदल उडाली आहे.

ही माकडे अन्नाच्या शोधात इथवर आली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

माकडांचा अशा प्रकारे मानवी वस्तीत असणे धोक्याचे असून या माकडांना कोणतेही खाद्यपदार्थ देऊ नये जेणेकरून ही माकडे पुन्हा मानवी वस्तीत येणार नाहीत.
- सुनीश सुभ्रमनिअन, वन अधिकारी

अन्न न मिळाल्यास ती पुन्हा आपल्या जंगलात जातील असेही त्यांनी सांगितले आहे.


हेही वाचा - 

ही मा़कडं थेट तुमच्या घरातच घुसतात!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा