Advertisement

माकडाची माणुसकी


SHARES

मुंबई - हल्ली माणुसकी कमी झाल्याचं नेहमीच ऐकायला मिळतं. कदाचित म्हणूनच एका माकडानं याचा आदर्श घालून दिलाय. माणसाच्या पतंगबाजीच्या खेळाची किंमत नेहमीच मुक्या प्राण्यांना मोजावी लागते. मकरसंक्रांतीच्या दिवशी बोरीवलीतील एका झाडावर एक कावळा पतंगाच्या मांजात अडकला. त्याने सुटकेसाठी आटोकाट प्रयत्न केला. पण, या मांज्याच्या फासातून सुटणं त्याला शक्य झालं नाही. मग चक्क माकडानंच रेस्क्यु ऑपरेशन सुरु केलं. त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि तो कावळा सुटला, पण तेवढ्यापुरतंच. दुर्देवानं तो पुन्हा अडकला. त्यानंतर मग पक्षीमित्रांनी पुढाकार घेत अखेर त्या कावळ्याला वाचवलं.​

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा