ही मा़कडं थेट तुमच्या घरातच घुसतात!

ही मा़कडं थेट तुमच्या घरातच घुसतात!
ही मा़कडं थेट तुमच्या घरातच घुसतात!
See all
मुंबई  -  

मुंबईच्या कफ परेडमध्ये पुन्हा एकदा माकडांची दहशत निर्माण झाली आहे. कफ परेड भागात असलेल्या शिवालय, मेकर टॉवर, लव्हली होमी, सायराना इमारतीत माकडांनी हैदोस घातला असून, या इमारतीत राहणारे रहिवाशी माकडांमुळे हैराण झाले आहेत. या इमारतीत राहत असलेले नागरिक माकडांच्या दहशतीमुळे आपल्याच घरात घाबरून बसले आहेत. माकडांपासून आपली सुटका करण्यासाठी आता करायचं तरी काय? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. सायनारा इमारतीमधील नागरिक या माकडांची शिकार होत आहेत.


माकडं घरातले किंमती फोन, घड्याळं आणि महागड्या वस्तू चोरून नेतात. या माकडांची इतकी दहशत पसरली आहे की, त्यांनी आमचं जगणं मुश्किल केलं आहे. माकडांच्या भितीमुळे सोसायटीमध्ये राहत असलेले निवासी आता गर्मीतसुध्दा आपल्या खिडक्या खोलू शकत नाहीत. ही माकडं इतकी हुशार आहेत की खिडक्यादेखील सहजपणे उघडतात आणि घरात घुसतात 

हरेश हातिरमानी, स्थानिक रहिवासी

माकड खिडकीचे दार उघडून घरात प्रवेश करतात आणि किचनमधील खायच्या वस्तू बदाम पिस्ता, आंबे घेऊ जातात. माकडांनी कम्प्युटरचे काही पार्ट्स देखील चोरले आहेत. सायनारा इमारतीत राहत असलेल्या जलपा मर्चन्ट यांच्या घरात माकडं घुसून आंबे खाऊन सोफ्यावर आंब्याचा रस पसरवून सर्वत्र नासधूस करून फरार झालीत. घरात एखादी चमकती वस्तू दिसली तरी उचलून ते पळ काढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

सायराना इमारतीतील 11 व्या मजल्यावरील एका घरात डायनिंग टेबलवर असलेले सामान आणि खाण्याचे पदार्थ घेऊन दोन माकडांनी पळ काढला. बाल्कनीत असलेली कुंडी देखील त्यांनी चोरून नेली. तसेच टेलिफोनची वायर देखील तोडून ठेवली आहे. गेल्या 7 महिन्यांपासून ही माकडं प्रत्येकाच्या घरात घुसून हैदोस घालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. माकडांची अनेकदा वनविभागात तक्रार केली असून, वन विभागाचे अधिकारी आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सायनारा इमारतीतल्या रहिवाशांनी सांगितले. 

वन्यजीव कायद्यानुसार माकडांना तेथून पकडण्यासाठी वनविभागाची मदत घ्यावी लागेल. संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यास आम्ही मदत करू 

- डॉ. मणिलाल, पेटा संस्थेचे जनसंपर्क प्रमुख

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.