Advertisement

कोविड संकटातील उपाययोजनांसाठी १४१ कोटींचा निधी वितरीत

कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना १४१ कोटी ६४ लाख २१ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.

कोविड संकटातील उपाययोजनांसाठी १४१ कोटींचा निधी वितरीत
SHARES

कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी विभागीय आयुक्तांना १४१ कोटी ६४ लाख २१ हजार रुपये निधी वितरित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिली.

यासंदर्भात अधिक माहिती देताना विजय वडेट्टीवार म्हणाले, कोविड १९ (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद यांनी ३१ मार्च २०२१ पूर्वी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीची मानके व बाबीनुसार केलेला खर्च भागविण्यासाठी विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद यांच्याकडून प्राप्त झालेल्या शिफारशी व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या बाबीविचारात घेऊन राज्य कार्यकारी समितीने २७ एप्रिल २०२१ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विभागीय आयुक्तांना रु. १४१,६४,२१,०००/- (रुपये एकशे एकेचाळीस कोटी चौसष्ट लाख  एकवीस हजार  इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

हेही वाचा- हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प राज्यात सुरू

यामध्ये विभागीय आयुक्त कोकणसाठी ७३१९.९७ लाख रुपये, विभागीय आयुक्त पुणेसाठी ५५७३.८५ लाख रूपये, विभागीय आयुक्त नाशिकसाठी २४५.२० लाख रूपये आणि विभागीय आयुक्त औरंगाबादसाठी १०२५.१९ लाख रूपये वितरित करण्यात आले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी घेतला होता. कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ व वेग देण्यासाठी, अधिग्रहीत खासगी रुग्णालयांमधील सुविधांच्या खर्चास मंजुरी देण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणाही त्यांनी केली. 

शासनाने अधिग्रहीत केलेल्या खासगी रुग्णालयांसाठी आवश्यक असणारी यंत्रणा आणि सामुग्री खरेदी करण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी यासाठीचा निधी खर्च करण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील कोरोना रुग्णांना आवश्यक उपचार आणि त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामुग्री आणि यंत्रणा तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते.

हेही वाचा- पंतप्रधानांना हात जोडण्याऐवजी मराठा बांधवांना जोडा, चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा