Advertisement

घाटकोपरमध्ये आठ दिवसांत 300 अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त


घाटकोपरमध्ये आठ दिवसांत 300 अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त
SHARES

मुंबईत रस्ते आणि पदपथावरील अनधिकृत बांधकामांविरोधात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत घाटकोपरमध्ये जोरदार कारवाई सुरू आहे. आठ दिवसांमध्येच येथील पदपथ आणि रस्त्यांवरील एकूण 302 झोपड्या आणि पक्क्या बांधकामांवर कारवाई करून पदपथ मोकळे करून दिले आहेत.

घाटकोपरमध्ये सलग सुरू असलेल्या या कारवाईमध्ये मंगळवारी लालबहादूर शास्त्री मार्गावरील अनधिकृत पक्क्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. या मार्गावर असलेले वाय. के. मोटर्सने केलेल्या बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला तर अमृतनगर सर्कल येथील 126 अनधिकृत बांधकामांवरही हातोडा चालवण्यात आला आहे. याशिवाय घाटकोपरमधील अनेक भागांमधील रस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण केलेल्या बांधकामांवर कारवाई करताना लालबहादूर शास्त्री मार्गावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, शेड्स, दुकाने यांच्यावरही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती ‘एन’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली आहे. 

मागील आठ ते दहा दिवसांपासून सलग रस्ते आणि पदपथांवरील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईची मोहीम सुरू असून त्याअंतर्गत आता 302 बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा