Advertisement

मुंबईत तब्बल ४ लाखाहून अधिक कामगारांची वापसी

मेट्रो-४, मेट्रो-४ अ आणि मेट्रो-७ प्रकल्पासाठी काम करत असलेले शेकडो कामगार परतत असून, आणखी कामगार परतण्याच्या मार्गावर आहेत, असाही दावा प्राधिकरणाने केला आहे.

मुंबईत तब्बल ४ लाखाहून अधिक कामगारांची वापसी
SHARES

अनलॉकनंतर मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे कामगार परत येऊ लागले आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. मेट्रो-४, मेट्रो-४ अ आणि मेट्रो-७ प्रकल्पासाठी काम करत असलेले शेकडो कामगार परतत असून, आणखी कामगार परतण्याच्या मार्गावर आहेत, असाही दावा प्राधिकरणाने केला आहे. कोरोनापासून आपाला बचाव करण्यासाठी मेट्रो प्रकल्पातील बहुसंख्य कामगारांनी आपले मूळ गाव गाठले होते. 

मुंबई मेट्रो लाइन ४ आणि ४ अ साठी काम करत असलेले अनेक कामगार परत येऊ लागले आहेत. यातील बहुतांश कामगार हे कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब, मध्य प्रदेश येथील मूळ गावी गेले होते. आता परत येत असलेल्या कामगारांमध्ये अकुशल कामगार ३२८, कुशल कामगार २१८ असे एकूण ५४६ कामगार परत आले आहेत.

येत्या आठवड्यात बिहार आणि पश्चिम बंगाल येथून आणखी कामगार परत येतील, असा आशावाद प्राधिकरणानं वर्तविला आहे. आठवडाभरात परतणाऱ्या कामगारांची संख्या २२८ असणार आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रातून १७५ कामगार परत येतील तर राज्याबाहेरून ७५५ कामगार परत येतील, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. भुयारी मेट्रो-३ चा विचार करता यासाठी येथे एकूण १५ हजार कामगार काम करत आहेत. 

महाराष्ट्र व बिहार, गुजरात, पश्चिम बंगालमधील ११ कुशल व निमकुशल कामगार मेट्रो ६ (जोगेश्वरी-विक्रोळी) च्या कामासाठी परत आले. मेट्रो ४ (वडाळा-कासारवडवली) आणि ४ अ - (कासारवडवली ते गायमुख) च्या कामासाठी ५४६ कामगार परत आलेले आहेत. या २ मेट्रो प्रकल्पांसाठी आणखी २८२ कामगार येत्या काही दिवसांत बिहार आणि पश्चिम बंगालहून परत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामं सुरु झाली आहेत. त्यामुळं मुंबई बाहेर गेलेले मजूर पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत.

जून महिन्यात एकूण ४ लाख ८१ हजार मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत. मुंबईच्या रेल्वे स्थानकावर दररोज १५ ते २० हजार मजूर दाखल होत आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्यात लॉकडाऊन लागू केल्यावर श्रमिक विशेष ट्रेनद्वारे मोठ्यासंख्येने कामगार आपल्या मूळगावी गेले. यामध्ये उत्तरप्रदेश आणि बिहार येथील सर्वाधिक मजूर आपल्या गावी गेले. पण आता राज्यात अनलॉक सुरू झाले आहे. त्यामुळे मजुरांना पुन्हा मुंबईच्या वाटेवर आहेत.

मुंबईत १ जून ते २५ जून यादरम्यान उत्तरप्रदेशातून १ लाख ९१ हजार ७४१ मजूर, बिहार मधून ८३ हजार ५१५ मजूर, राजस्थानमधून ५८ हजार ३६४ मजूर, पश्चिम बंगालमधून २२ हजार ५६५ मजूर, केरळ मधून १७ हजार २ मजूर, कर्नाटकमधून १९ हजार १०७ मजूर, तेलंगणामधून ११ हजार १७५, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली येथून ७८ हजार ४२४ मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत.



हेही वाचा -

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा