Advertisement

भाऊबीजनिमित्त मुंबईत ९० हजार किलोहून अधिक श्रीखंडाची विक्री


भाऊबीजनिमित्त मुंबईत ९० हजार किलोहून अधिक श्रीखंडाची विक्री
SHARES

यंदा भाऊबीजनिमित्त मुंबईत ९० हजार किलोहून अधिक श्रीखंडाची विक्री झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच, यामध्ये केशर ड्रायफ्रूट, आम्रखंड, अंजीर या श्रीखंडाला जास्त मागणी होती. यंदा भाऊबीज मंगळवारी आल्यानं घरी आलेल्या भावासाठी मांसाहारी जेवणाचा (चीकन, मटण) बेत रद्द करून शाकाहारी जेवणाचा बेत आखला. त्यामुळं अनेक बहिणींनी श्रीखंड-पुरीला प्रथम प्राधान्य दिलं.

मुंबईतील विविध भागांतील नामांकित मिठाईच्या दुकानांमधून प्रत्येकी सरासरी दीडशे ते दोनशे किलो श्रीखंडाची विक्री झाल्याचं समजतं. भाऊबीज मंगळवारी येत असल्याचं आधीच स्पष्ट झाल्यानं सोमवारी पाडव्याच्या रात्रीपासूनच अनेक दुकानांमध्ये श्रीखंड खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. तर मंगळवारी दुपारी १२ वाजेपर्यंत या रांगा कायम होत्या.

यंदा श्रीखंडाला इतर वर्षांपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. दुकानदारांनी नियमित अंदाजानुसार जास्त श्रीखंड तयार केलं होतं. त्याचप्रमाणं यंदा ग्राहकांची केशर ड्रायफ्रूटआम्रखंडअंजीर या श्रीखंडाला जास्त मागणी होती. 



हेही वाचा -

बेस्टचं तिकीट भाडं वाढणार नाही, प्रवाशांना दिलासा

दिवाळीनंतर मिळणार बेस्ट कामगारांना बोनस



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा