Advertisement

एमपीएससीच्या उमेदवारांनो, ३१ मेपर्यंत प्रोफाईल आधारशी जोडा, नाहीतर...

३१ मे पर्यंत आधार कार्ड लिंक न केल्यास उमेदवाराचं प्रोफाईल निष्क्रिय (डिअॅक्टीव्ह) करण्यात येणार असल्याचंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

एमपीएससीच्या उमेदवारांनो, ३१ मेपर्यंत प्रोफाईल आधारशी जोडा, नाहीतर...
SHARES

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा (एमपीएससी) कडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी यापुढं आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रोफाईलला आधार कार्डची लिंक जोडणंही बंधनकारक आहे. मात्र अजून मोठ्या संख्येनं उमेदवारांनी आधार कार्ड लिंक प्रोफाईलशी जोडलेलं नसल्याने आयोगानं एका परिपत्रकाद्वारे एमपीएससी उमेदवारांना १ जून २०१८ पर्यंत प्रोफाईलशी आधार कार्ड लिंक जोडण्याच्या सूचना केल्या आहेत.

त्यानुसार ३१ मे पर्यंत आधार कार्ड लिंक न केल्यास उमेदवाराचं प्रोफाईल निष्क्रिय (डिअॅक्टीव्ह) करण्यात येणार असल्याचंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.



३१ मे पर्यंत मुदतवाढ

एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची ओळख पटावी यासाठी मार्च २०१७ पासून आयोगानं उमेदवारांना आधार कार्ड प्रोफाइसोबत लिंक करणं बंधनकारक केलं आहे. या नियमांची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे. पण एक वर्ष होऊन गेलं तरी असंख्य उमेदवारांनी प्रोफाइलसोबत आधार कार्ड लिंक केलेलं नाही. त्यामुळे आता आयोगानं कडक पाऊल उचलतं ३१ मे पर्यंतची मुदत उमेदवारांना दिली आहे.


तर, प्रोफाइल होणार निष्क्रिय

त्यामुळे उमेदवारांनी ३१ मे पर्यंत आधार लिंक न केल्यास त्यांच प्रोफाईल निष्क्रिय केलं जाणार आहे. त्याचा मोठा फटका उमेदवारांना बसू शकतो. कारण प्रोफाईल निष्क्रिय झाल्यास उमेदवारांना आपलं प्रोफाईल पाहाता येईल, पण त्यांना परीक्षेसाठी अर्ज करता येणार नाही.



हेही वाचा-

एमपीएससीच्या टाॅप २० मध्ये एकटाच मुंबईकर

एमपीएससी, यूपीएएसीच्या उमेदवारांची लूट- विनोद तावडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा