Advertisement

एमपीएससी, यूपीएएसीच्या उमेदवारांची लूट- विनोद तावडे

आर्थिक लुटीचा प्रश्‍न ज्वलंत होण्यामागे २ महत्त्वाच्या बाबी आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएएसी’ परीक्षेच्या किती जागा भरायच्या आहेत, याची उमेदवारांना माहिती नसते आणि दुसर्‍या बाजूला खासगी कोचिंग क्लास खोट्या जाहिराती काढून अनेक जागा भरायच्या आहेत, असं दाखवून उमेदवारांकडून लाखो रुपयांची घेतात, अशी माहिती तावडे यांनी विधानपरिषदेत दिली.

एमपीएससी, यूपीएएसीच्या उमेदवारांची लूट- विनोद तावडे
SHARES

खासगी कोचिंग क्लासकडून खोट्या जाहितीरातींद्वारे उमदवारांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला.

कशी होते फसवणूक?

आर्थिक लुटीचा प्रश्‍न ज्वलंत होण्यामागे २ महत्त्वाच्या बाबी आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे ‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएएसी’ परीक्षेच्या किती जागा भरायच्या आहेत, याची उमेदवारांना माहिती नसते आणि दुसर्‍या बाजूला खासगी कोचिंग क्लास खोट्या जाहिराती काढून अनेक जागा भरायच्या आहेत, असं दाखवून उमेदवारांकडून लाखो रुपयांची घेतात, अशी माहिती तावडे यांनी विधानपरिषदेत दिली.

‘एमपीएससी’ आणि ‘यूपीएएसी’च्या उमेदवारांची खाजगी कोचिंग क्लासकडून होणार्‍या आर्थिक फसवणुकीच्या प्रश्‍नावर उपस्थित करण्यात आलेल्या अल्पकालीन चर्चेत तावडे यांनी ही माहिती दिली.

अभ्यास केंद्रांची स्थापना

यावेळी तावडे म्हणाले, उमेदवारांची ही लूट थांबवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेचा सराव करून घेण्यासाठी शासनाकडून अभ्यास केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे अभ्यास केंद्र कार्यरत झाली असून सातारा आणि जळगाव या जिल्ह्यात लवकरच अभ्यास केंद्र सुरू करण्यात येईल.

शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय

या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून मागील प्रश्‍नपत्रिका सोडवून घेण्यात येत आहेत. तसंच त्यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. याविषयी अधिवेशनानंतर विद्यार्थ्यांसोबत बैठकही घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी या चर्चेला उत्तर देताना दिली.

हेही वाचा-

पेपरफुटीचं खापर फक्त कोचिंग क्लासवर का?

आझाद मैदान आंदोलनाला खासगी कोचिंग क्लासेसची फूस?

विद्यार्थ्यांनो, आता सुट्टी करा एन्जॉय

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा