Advertisement

आरे कॉलनीतील एकही झाड तोडायचं नाही, महापौरांचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आदेश

महापौरांनी शितलामाता परिसरातील पुनर्रोपीत करण्यात आलेल्या वृक्षांची पाहणी केली. यावेळीही बरेचसे वृक्ष मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मेट्रो ३ च्या अधिकाऱ्यांचं याकडे होणारं दुर्लक्ष व झाडे पुनर्रोपीत करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान नसल्याबद्दल कानउघडणी केली.

आरे कॉलनीतील एकही झाड तोडायचं नाही, महापौरांचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आदेश
SHARES

कुलाबा ते सीप्झ या मेट्रो ३ प्रकल्पांतर्गत आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या जागेवरील कापण्यात येणाऱ्या झाडांची पाहणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह महापालिकेतील गटनेत्यांनी केली. या पाहणीत झाडे कापल्यानंतर त्याबदल्यात होणारं झाडांचं पुनर्रोपण यशस्वी झालं नसल्याची बाब समोर आली. मुंबईच्या पर्यावरणाचं यातून मोठं नुकसान होण्याची भीती यावेळी उपस्थितांनी केली. त्यामुळे भविष्यात या प्रकल्पासाठी एकही झाड तोडण्यात येवू नये, असे आदेश महापौरांनी मेट्रो ३ च्या अधिकाऱ्यांनी दिले.


दौऱ्यात कुणाचा समावेश?

आरे काॅलनीतील मेट्रो प्रकल्पाच्या भेटीत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासोबत उप महापौर हेमांगी वरळीकर, विरोधी पक्षनेते रवी राजा, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर, बाजार व उद्याने समिती अध्यक्षा सान्वी तांडेल, नगरसेवक कप्तान मलिक, जगदिश अमिन कुट्टी, नगरसेविका प्रिती पाटणकर, स्मिता गावकर, सुवर्णा करंजे, रेखा रामवंशी, के/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन, उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी तसेच मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या मेट्रो ३ चे अधिकारी उपस्थित होते.


वृक्षतोडीचा अहवाल द्या

या सदस्यांनी सर्वप्रथम जोगेश्वेरी विक्रोळी लिंक रोडलगतच्या सारीफत नगर येथील कामांची पाहणी केली. गुगल इमेजवरुन ६ महिन्यांपूर्वी स्थिती आणि आताची वृक्षांची संख्या याची माहिती घेण्यात आली. किती वृक्ष येथे तोडण्यात येत आहेत? किती पुनर्रोपीत करण्यात येत आहेत? ते कुठल्या जातीचे आहेत? असा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांना यावेळी करण्यात आली.


सदस्यांपुढे सादरीकरण

मेट्रो ३ च्या कामासाठी एकूण १ हजार २८७ हेक्टर जागा लागणार असून ३३ हेक्टरवर मेट्रो कारशेड उभारणार असल्याची माहिती मेट्रो ३ च्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याासोबतच एकूण २ हजार ६६५ वृक्ष तोडण्याात येणार असून वनविभागासोबत झालेल्या. करारान्वये पुनर्रोपीत केलेल्या‍ वृक्षांचं ७ वर्षांपर्यंत संवर्धन करण्याची जबाबदारीही वनविभागाकडे सोपवण्यात आल्याची माहिती मेट्रो ३ च्या अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली.


मेट्रो अधिकाऱ्यांची कानउघडणी

त्यानंतर महापौरांनी शितलामाता परिसरातील पुनर्रोपीत करण्यात आलेल्या वृक्षांची पाहणी केली. यावेळीही बरेचसे वृक्ष मृत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी मेट्रो ३ च्या अधिकाऱ्यांचं याकडे होणारं दुर्लक्ष व झाडे पुनर्रोपीत करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान नसल्याबद्दल कानउघडणी केली. शहरात झाडांची संख्या घटल्यास त्याचा पर्यावरणाला मोठा धोका आहे. वातावरणात कार्बनडायआॅक्साईड, मिथेन, सल्फरचं प्रमाण वाढल्यास भावी पिढीच्या आरोग्यवर परिणाम होऊ शकतो, असं ते म्हणाले.हेही वाचा-

'हे' पैसे थेट महिलांच्या खात्यात, स्थायी समितीचा विरोध

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनासाठी शिवसेनेने पसरले महापालिकेकडे हात


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा